पान:काश्मीर वर्णन.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १०१ )

येथें बिजबिहार नांवाचें एक सुंदर देवालय अशोक राजानें बांधिलें होते पण शिकंदर बादशाहानें त्याचा नाश करून त्या स्थली एक मशीद बांधिली. पुढें गुलाबसिंगाचे हातीं हा देश आल्यावर त्यानें ती पाडून तेथें पुन्हा देवालय बांधिलें. येथून काही अंतरावर बवन् नांवाचें खेडें लागतें. याच्याजवळ भौमजो नांवाची गुहा आहे, तींत एक देवालय आहे. तेथें एक झरा असून त्यास लोक मोठा पवित्र मानितात. येथून इस्लामबाढ़ चार पांच मैलांवर राहते. येथें चिनार वृक्षांची राई इतकी दाट लागून गेली आहे कीं, तींत सूर्यप्रकाशाचा मुद्रां रिघाव होत नाही. या राईच्या ठिकाणी पूर्वकालीं एक मोठा बगीचा असल्याच्या खुणा दृष्टीस पडतात. यास लागून एक देवालय व तलाव आहे. यांतील पाण्यास गंधकाचा वास मारितो व त्यांत मासे पुष्कळ आहेत. येथून एक मैलावर दोन मोठ्या गुहा आहेत. थोरली गुहा पाहाण्यास मशालीचे मदतीनें दोनशें फूट पर्यंत आंत जातात. येथें यात्रा भरते ह्मणून त्यास काश्मीरी भाषेंत भमज्यू असें ह्मणतात. दुसरींत एक हिंदू देवालय असून त्याचें काम पाहण्यासारिखें आहे. येथून -

मार्तड — नांवाचें जुनें गांव व देवालय हीं एक

मैलावर आहेत. यांची स्थापना ललितादित्य राजानें केली ह्मणून लेख आहे. पूर्वकाली येथें रामपूरस्वामी नांवाचें एक शहर होतें. वर सांगितलेले देवालय सूर्या प्रीत्यर्थ बांधिलें होतें ह्मणून त्यास मार्तंड असें नांव पडलें आहे. त्याचा कांही भाग अद्यापि दृष्टीस पडतो. हें