पान:काश्मीर वर्णन.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ९९ )

याच्या छताचेंही काम दगडी आहे आणि त्यांत अप्सरांची चित्रे खोदिली असून त्यांच्या हातांत पुष्पगुच्छ दिले आहेत. हा तलाव चौरस असून त्याची प्रत्येक चाळीस यार्ड लांब आहे. पावसाळा लागण्यापूर्वी यांत बाजू पाणी फार थोडें असतें आणि त्यांतून देवालय पाहाण्यास जातां येतें. हें काम कौरव पांडवांच्या वेळचें असावें असें कांही लोक मानितात पण त्यास आधार नाही. हें देवालय व दुसऱ्या देवालयांचे जे अवशिष्ट भाग येथें दृष्टीस पडतात, त्यांवरून अवंतीपूर व मार्तंड या गांवां- तील इमारतीपेक्षां या देवालयांचें काम मोठें भव्य असावें असें अनुमान होतें. पेशावराजवळ गांधार नांवांचे जे मोठे मठ होते, त्यांच्याच नमुन्यावर हीं देवा- लयें बौद्ध धर्माच्या राजांनी बांधिलेली असावीत असें दिसतें. येथें प्रवरसेन नांवाचें एक शिवस्थान होतें. पांपूर नांवाचें गांव येथून जवळ असून तेथील केशराचे बाग व दुसरी स्थ यांचें वर्णन पूर्वी दिलेच आहे. याच्या दक्षिणेस चार मैलांवर ललितपूर नांवाचें एक देवालय असून तें ललितादिय राजाने बांधलें असावें असें ह्मणतात. पांपूराहून तीन मैलांवर विअन नांवाचें एक स्थल आहे. तेथें गंधक व लोह यांच्या मिश्रणाचे तीन व गोड्या पाण्याचा एक असे चार झरे आहेत. यांतील पाण्यास इंग्रजीत (मिनरल वाटर ) खनिज पाणी असें ह्मणतात. या झज्यांच्या शेजारी पुष्कळ सुवर्णमुखी असून त्यांतून पाणी येत असल्यामुळे तें जर्मनी व इंग्लंद येथील मिनरल वाटरप्रमाणें आमवात, कष्टसाध्य त्वचा रोग, ज्वरानें उत्पन्न झालेला साधारण अशक्तपणा व काळीज