पान:काश्मीर वर्णन.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ९८ )

•याशिवाय पेरिमहाल, नसिबबाग, हजारीबाग, बसंत- बाग इत्यादि दुसरे बगीचे आहेत. पेरिमहाल दलसरोवरा- च्या दक्षिणेस एका मैलावर आहे. येथें सरळ रेषेंत एकाहून एक उंच अशीं सात दालनें बांधिली आहेत. ही इमारत जहांगीर बादशाहानें त्याच्या गुरूच्या सुचनेवरून विद्या- लयाकरितां बांधिली होती असें ह्मणतात; कोणी ती आपल्या प्रियेच्या समागम सुखाचा उपभोग घेण्याकरितां तयार केली होती ह्मणतात. सांप्रत ती अगदीं मोडकळीस आली आहे. पण तिजवरून सरोवराचा देखावा मात्र सुंदर दिसतो.

बाहेरील स्थलें.

येथपावेतों आह्मीं आमच्या वाचकांस श्रीनगर शहराची बरीच माहिती करून दिली. आतां बाहेरील कांही प्रसिद्ध व रम्य स्थलांची ओळख करून देतों. पाद्रितन्–श्रीनगरच्या आग्नेयीस तीन मैलांवर पादितन् नांवाचें एक स्थळ आहे. येथें प्राचीन काळी पुराण - आदिस्थान नांवाची राजधानी होती. तिचा अपभ्रंश होऊन वरील नांव पडलें आहे. चंद्रगुप्ताचा नातू अशोक यानें येथें कांहीं देवालयें बांधिली असून त्यांतील एकांत बुद्धाचा दांत ठेविला होता. पुढें तो दांत कनो- जचा बलाढ्य राजा जो अभिमन्यु याच्या स्वाधीन करवा • लागला. त्यानें या सर्व देवालयांस आग लावून त्यांचा विध्वंस करून टाकला. त्यांतील एक देवालय तलावांत • असल्यामुळे तें मात्र बचावलें. याचें काम दगडी असून त्याचा आकार मनोन्यासारिखा आहे. देवालयाप्रमाणें