पान:काश्मीर वर्णन.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(९७ )

हिची रचना, येथील कारंजी, पाण्याचे खजिने हीं सर्व शालिमार बागेप्रमाणेंच आहेत. शालिमार बागेत ज्या प्रवाहाचें पाणी आणिलें आहे, त्याच प्रवाहाचें पाणी या बागेंतील खजिन्यांत आणून सोडिलें आहे. यांतील बंगल्यांची संख्या शालिमारपेक्षा अधिक आहे. हां बागही जहांगीर बादशाहानें आपल्या प्रियेकरितां तयारं करविला होता. याचे भोंवतीं पाप्लर व चिनार वृक्षांची दाट झाडी लागून गेली आहे. सर्वात खालचा बंगला दुमजली आहे. खालच्या मजल्याच्या मध्यभागी एक मोठें कारंजें राखिलें आहे. ब्रेन नांवाचें खेडें या बागेच्या दक्षिणेस आहे. तें सर्व द्राक्षवेलींनी आच्छादून गेलें आहे. येथून चाष्माशाई नांवाचा बाग व झरा पहावयास गेलों. या बागेत एकावर एक चढते पण पृथक् असे तीन बंगले असून त्यांतील पाण्याचा नळ, खजिने, कारंजी व कृत्रिम धबधबे यांची रचना वरील दोन बंगल्यांतील रचनेप्रमाणेंच आहे. हा बाग अकबर बादशाहानें तयार करविला होता असें ह्मणतात. चाष्माशाई नांवाचा झरा या बागेच्या दक्षिणेस आहे. त्याचें पाणी आणून या बागेंत खेळविलें आहे. झज्याचें पाणी मोठें स्वच्छ, गार, व पाचक असल्यामुळे श्रीनगर येथील श्रीमान् व साहेब लोक तें आणून पितात. या झऱ्याच्या आसपास द्राक्षवेलीचे पुष्कळ मंडप दृष्टीस पडले. या वेळी थंडी फार असून तृषाही नव्हती पण स्वदेशी परतल्यावर हैं पाणी आह्मांस कोठून मिळणार असा विचार करून आह्मीं तें दोन तीन ओंजळी प्यालों. या अमृततुल्य उदकाची स्तुति कशी करावी हे आह्मांस समजत नाहीं. या 9