कोरीव चित्रांनी आणि वेलानी भरलेल्या आहेत. कित्येक पुतळे
भंगलेले आहेत. परंतु बाकीचे सर्व दुरस्त आहेत.प्रत्येक
बाजूस पांच पांच ओळी असून दर दर ओळीत सहा सहा चित्रे
ह्याप्रमाणे चारी बाजूंत मिळून एकंदर १२० चित्रे
येथे पैसा मुचलग खर्च करून जितके कुशळ कारागीर
हल्लींच्या दिवसांत हिंदुस्थानांत मिळाले तितके येथे कामास लावले
असावे असे अनुमान होते. काशीस आल्यावर हे राममंदीर या
त्रेकऱ्यानें पाहिल्या खेरीज राहूं नये. सगळ्याच्या खालच्या ओळीं-
त हत्तीची चित्रे आहेत. हत्तीवर सिंह आणि सिंहावर देवाचे
दुसरे अवतार ह्याप्रमाणे चित्रे कोरलेली आहेत.
येथें गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या तीन नद्यांच्या वेग वेग-
ळ्या कोनाड्यांतून मूर्ति बसविलेल्या आहेत. त्याप्रमाणेच दोन
गोपींसह श्री कृष्णाची मूर्त आहे, इंद्र, ब्रम्हदेव, विष्णु आणि
शंकर ह्यांच्या मूर्तिही येथे कोनाड्यांतून स्थापिल्या आहेत. त्या-
प्रमाणेच कुबेर, भैरवनाथ, रामचंद्र, सीता, गणपती, बलीराम,
ह्यांच्या मूर्ति आहेत. याप्रमाणेच वायू, सूर्य, अग्नेि, आाणि चं-
द्रमा ह्यांच्याही मूर्ति आहेत. शिवाय नारद, तुंबर, गजेंद्रमोक्ष,
आणि सहस्रार्जून ह्यांच्या मूर्ति आहेत. दक्षिणेकडील वरल्या
ओळींत मध्यभागी दुर्गादेवीची मूर्ति आहे. पूर्वेस वरल्या ओळीत
मध्यभागी महाकाली आहे. उत्तरेच्या भिंतीस कोनाड्यांत
श्री कृष्णानीं गोवर्धन पर्वत उचलून जी क्रीडा केली तो सर्व प्र.
कार आहे. ह्या देवालयाच्या चारी कोपऱ्यांस वरच्या आंगास
एकावर एक अर्शी मूर्यांची दोन दोन तोंडे करून बसविलेली आहे-
त. त्यांस मुलामा केलेला आहे.
घुमटाच्या चारी कोपऱ्यांस सूर्याची तोंडें एकावर एक अशी
दर कोपन्यास दोन दोन प्रमाणे असून त्यांच्या सभोवती रश्मि प्रभा
दाखविली आहे. ह्या तोंडांस सोन्याचा मुलामा केला आहे. घुम-
टाच्या शिखरावर एक सोनेरी मुलाम्याचें दुर्गेचे मुख करून बस-
पान:काशीयात्रा.pdf/८२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७९