Jump to content

पान:काशीयात्रा.pdf/८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७८

बाजूंनी पायऱ्या आहेत. त्या उतरून खालीं गेलें म्हणजे तळचे पाणी मधील मोठ्या भव्य कमानीतून इकडून तिकडे जाते ते मोठ्या मौजेचें दिसतें. हा कुवा अहिल्याबाई राणी, बहारचा राजा आणि अमृतराव साहेब पेशवे या त्रिवर्गांनी वेगवेगळ्या काळी बांधिला. येथे एक सूर्यनारायणाचे दगडी यंत्र आहे. त्याची पूजा करण्यास दर रविवारी गर्दी जमते. आतां येथून पुढे दुसरा मोहोल्ला लागला त्याचें वर्णन पुढील पत्रीं करूं. लोभ असावा हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.



व्यासकाशी व रामनगर.

मुक्काम श्री वाराणशी
ता० जानेवारी १८७२.

ज्ञानप्रकाशकर्ते यांस :-
 वि० वि०. आज रोजी रामनगराकडील हकीकत थोडीशी लिहितो. रामनगर हे गंगापार आहे. येथील राजाचे संस्थान मोठें टुमदार आहे. रामनगरास यात्रेकरू लोक काशींतून व्यासाच्या दर्शनास जातात. ह्या व्यासकाशीचे वर्णन मागाहून करूं. हल्ली रामनगरच्या राजाने जे मंदीर बांधिले आहे त्याचे येथे थोडेसे वर्णन करितों. रामनगरच्या किल्ल्यापासून सुमारे एक मैलावर रामनगरच्या राजानें बांधिलेले श्री रामचंद्राचें मंदीर आहे. ह्याच्या पश्चिमेस एक मोठा तलाव आहे. हे राममंदीर हल्लींचे जे राजे साहेब आहेत त्यांचे वडील राजे चेतसिंग होते त्यानी आरंभिले. व त्यांच्या मागे त्यांच्या चिरंजिवानी संपविले. हे देवालय खालच्या जोत्याच्या बेद्रीपासून शिखरापर्यंत १०० फूट उंच आहे. ह्याच्या चारी बाजू तळापासून सुमारे ३५-४० फूट उंच पावेतों