पान:काशीयात्रा.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०

विले आहे. खाली सभामंडपाच्या चौथऱ्यावर तिन्ही दरवाज्यांक- डे तोडे करून तीन मूर्ति संगमरवरी दगडाच्या करून बसविल्या आहेत. दक्षिणेकडील दरवाज्यासमोर नंदिकेश्वर, उत्तरेकडील दरवाज्यासमोर गरूड आणि मुख्य जो वागता दरवाजा त्या समोर सिंह असे आहेत. ह्या दरवाज्याच्या झडपा पितळी पत्र्याने मढविलेल्या आहेत. ह्या देवालयाच्या आंतील देवालयांत दरवाज्या समोर संगमरवरी दगडाची दुर्गेची मूर्त आहे. (ह्या देवालयाच्या आंतील देवालयांत दरवाज्या समोर संगम- रवरी दगडाची दुर्गेची मूर्त आहे.)ह्या दुर्गेच्या शेजारच्या डाव्या कोन्गडयांत राधा कृष्णाची मूर्त आहे. आणि उजव्या कोनाड्यांत पंचमुखी शंकराची मूर्त आहे.ह्या देवालयानजीक एक बाग असून आंत तलाव आहे.तो राजा चेतसिंग याणी बांधिला म्हणून सांगतात.ह्या तलावास चोहोकडून घाट बांधिला आहे. जे यात्रेकरी व्यास काशीस येतात ते सर्व बहुत करून येथे स्नानें करितात.
 रामनगरास यात्रेस जाण्याबद्दल अशी कथा सांगतात की, एका समयीं वेदव्यास वाराणशीस येण्याकरितां निघाले. आणि येतां येतां रामनगरापाशी आले तेव्हां त्यांस ती जागा फारच आवडली आणि ते तेथेच राहिले. नंतर त्या जागी जो कोणी या त्रेस येईल व्यास मुक्ती प्राप्त होईल असा वर यांनी त्या क्षेत्रास दिला.तेव्हां शंकरास राग आला.आणि जो कोणी व्यास काशीत मरण पावेल त्यास पुढल्या जन्मीं गर्धभयोनी प्राप्त होईल असा त्यानी शाप दिला. नंतर वेद व्यासानी रामनगरांत एक तीर्थ निर्माण केले. आणि माघ महिन्यांत व विशेष करून त्या महिन्याच्या शक्रवारी आणि सोमवारी जो कोणी त्या तीर्थात स्नान करील त्यास तो व्यासकाशीत मरण्यापासून जी गर्वभयोनो प्राप्त होणार ती व्हावयाची नाही. असा उशाप त्यांनी दिला.
 रामनगरास जो राजाचा किल्ला आहे त्यांत कोटाच्या भिंतीवर