पान:काशीयात्रा.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४

 तिरस्थळी (त्रिस्थळी) ची यात्रा करणाऱ्याने श्री वाराणशीस आ- ल्यावर पिशाच मोचनाची यात्रा केली नसली तर त्यास गयेची या- त्रा करण्याचा अधिकार येत नाहीं, परंतु कोणी यात्रेकरू अज्ञानाने काशी प्रयागची यात्रा करून काशींतील पिशाच मोचनाची यात्रा न करितां गयेस गेला तर गयावळ त्यास लागली पिशाच मोचनाची यात्रा केली किंवा नाही ह्याबद्दल प्रश्न करितात. केली नसल्यास गयेस पिशाच मोचनाचे स्थान अक्षयवटाकडे आहे तेथे प्रथमतः विधियुक्त पिशाच मोचनाची यात्रा करवून नंतर गयावर्जनास आरंभ करवितात.
 परंतु एडिटर महाराज, हा जो यात्रेचा क्रम म्यां लिहिला तो प्राचीन काळचा बरें. हल्ली जर विचाराल तर ह्या आगगाडीने आणि तारायंत्रानें जो विलक्षण वेग यात्रेस आला आहे तो फारच आश्चर्यकारक आहे. ज्या गयेच्या यात्रेस पुरे ६० दिवस अवश्य आहेत ती यात्रा दोन दिवसांत संपून पार! आगगाडीने जितका काळ मार्ग क्रमणाचा कमी केला आहे, त्याचप्रमाणे गयावर्जनाचा काळही कमी झाला आहे. श्राधाची जी फजिती उडाली आहे ती तर लिहिण्याची सोयच नाहीं. अग्नीकरण, ब्राम्हण भोजन आणि पिंडदान हीं श्राद्धाची मुख्य तीन अंगे असतां आम्हास ते यथासांग करण्यास अवधि आणि सामर्थ्य असतां आम्ही ते सर्व पिंडदानावर आणि एक पैसा दक्षिणेवर भागवितों, तेव्हां शाबास आमची किंवा नाहीं एडिटरराव?
 येथे म्हणजे पिशाचमोचनीं वर्षांतून बरेच मेळे भरतात. त्यां- त मुख्य म्हटला म्हणजे काय तो पोषवद्य १४ म्हणजे आपल्या तिकडील मार्गशीर्षवद्य १४ चा. ह्या मेळ्यास रोटया भट्याचा मेळा असे म्हणतात म्हणजे साधारणतः मुळ्याच्या थालीपिठाचा मेळा असे म्हटले तरी चालेल. ह्याचे कारण असे कीं, रांगडे लोक त्या दिवशी मु ळ्यांनी मिश्रित केलेले कणकीचे रोट त्या यात्रेत आणितात आणि खातात. हा मेळा फारच मोठा भरतो. सर्व अलम दुनिया तेथे