पान:काशीयात्रा.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५५

जमते. एडिटरराव ह्या मेळ्यांत जे मुळे विकावयास येतात तेव- ढे मोठे मुळे म्यां कधीं व कोठेंच पाहिले नाहीत. एकेक मुळा १४ तसूंच्या हाताने १। हात लांब आणि ६-७ इंच घेराचा. एकेक मुळ्याचें वजन सुमारें ६–७ पक्के शेर असून किंमत २-३ पैसे.
 विमल तीर्थ म्हणून जो तलाव आहे त्याच्या पूर्वेकडील घाटाचा कांहीं भाग सुमारे ८० वर्षांपूर्वी कोणी गोपाळदास साहू ह्या नांवाच्या सावकाराने बांधविला आणि बाकीचा भाग आणि त्यावरील देवालय ही मृगाबाई ह्मणून कोणी सावकाराची स्त्री होती तिनें बांधविला असे कळते. पश्चिमेच्या आंगचा घाट आणि त्यावरील बुरूज हेही तितकेच जुने आहेत. घाट कोणीं बळवंतराव बाकिरा ह्यानें आणि बुरूज मिरजा खुरमशा ह्याने बांबविले. उ. त्तरेच्या आंगचा घाट १०० वर्षांपूर्वी राजा मुरलीधर ह्याने बांधवि- ला, परंतु दक्षिणेकडील घाटाचें काम फारच जुने आहे. तो सुमारे ३०० वर्षांपूर्वी राजा शिवशंबर ह्याने बांधविला. त्याच्या कांही भागाचा जीर्णोद्धार थोड्या वर्षांपूर्वी विनायकराव साहेब ह्यानी करविला.
 पूर्वेकडील घार्टी दोन देवालये एक नक्कुमिश्र ह्याने आणि दुः सरे मृगाबाईने अशी बांधविली.
 मृगाबाईने जे महादेवाचे देवालय पिशाचमोचनीं बांधविलें आहे त्यांत मुख्य दैवत शिव असून त्याचे जवळच ज्या पिशाचा चें शिर कालभैरवानें छेदिले त्याचें द्योतक दगडी शीर भयंकर आ काराचें करून बसविले आहे. ह्याच्या पलीकडे श्री लक्ष्मी नारा- यणाच्या मूर्ति आहेत. ह्या सर्व मूर्तिजवळच एक ऋषीची मूर्ति आहे. ह्याच देवळाच्या पूर्वेस कोपन्यास पांच सोंडेच्या गणप- तीची मूर्ति आहे.
 नगरीच्या ह्याच आंगास दुसरें एक कुंड आहे त्याला मूर्यकुंड ह्मणतात. ह्या कुंडांत पूर्वी १२ कूप होते त्यांपैकी २ कूप हल्ली उपलब्ध आहेत. ह्या कुंडांत एका आंगास घाट आहे त्या-