Jump to content

पान:काशीयात्रा.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३

द्ध आणि दुसरे विमल तीर्थनयुक्त श्राद्ध ही करावी लागतात. ज्या च्या घरांत कांहीं पिशाचाचा उपद्रव असेल त्यास पहिले श्राद्ध करणें अवश्य आहे, नाहींपेक्षां फक्त दुसरेच केले म्हणजे बस होतें. पहिल्या श्राद्धाच्या संकल्पांत भूम्यांतरिक्षादिविस्थानां आज्ञा तनाम गोत्राणां प्रेतार्ना उत्तम लोक प्रात्यर्थं असे म्हणावे लागतें. क्षेत्रस्थ जे लोक आहेत ते वर्षांतून एकवार तरी ह्या विमलतीय स्नान करितात. ह्या तीर्याच्या स्नान करून ब्रम्हराक्षासादि पिशा- चांच्या पीडा परिहार होतात. ह्या क्षेत्राची कोतवाली कालभैरवा- कडे श्री विश्वेश्वरानीं दिलेली आहे ह्याकरितां त्यांचे दूत ह्या क्षेत्रा- च्या संरक्षणार्थ चोहीकडे पहारा करीत असतात.एके दिवशी असा चमत्कार झाला की, कोणी एक महद्भूत जिवाचा धडा करू. न वाराणसीस येऊं लागला. तेव्हां तो ह्या नगराची पंचक्रोशीची जी प्रदक्षणा आहे त्या मार्गावर आला. तेव्हां त्यास भैरवनाथाच्या दूतांनी अडविलें आणि नगरीत जाण्यास प्रतिबंध केला. तेव्हां त्या ब्रम्हराक्षसाने त्या भैरव दूतांशी युद्ध केले आणि त्यांचा पराभव करून आपण पुढे चालता झाला. मार्गाने येतां येतां तो विमल तीर्थ कुंडापाशी आला. तेव्हां खुद्द भैरवेश्वराची आणि त्याची गांठ पडली. आणि उभयतांचें युद्ध जुंपलें. युद्धांत भैरवांनी आपल्या खड्गाने त्याचा शिरच्छेद केला आणि तें शीर घेऊन श्री विश्वेश्वराकडे वर्दीस गेले. वर्दी देताहेत तोच त्या महदुताच्या शिरानें श्री विश्वेश्वराच्या स्तवास आरंभ केला. हे पाहून उभ- यतांस परमाश्चर्य वाटले. त्या स्तवें करून श्री विश्वनाथ भोळे- चते संतुष्ट झाले आणि त्या महदुतास वर माग म्हणून म्हणाले. तेव्हां त्याने मला श्री वाराणशी क्षेत्री विमल तीर्थी निरंतर राहण्याची परवानगी मिळावी म्हणून वर मागितला. त्याप्रमाणें श्री विश्वेश्व- रांनी त्यास वर देऊन सांगितले की, इत उत्तर कोणीही दुष्ट पि शाचाचा प्रवेश ह्या नगरांत न होई असा बंदोबस्त तूं ठेव. ह्या- प्रमाणे येथील पिशाच मोचनाची कथा आहे महाराज.