Jump to content

पान:काशीयात्रा.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२

मोठे असून ह्यांत एक मठ आहे. ह्या मठांत वाराणशी क्षेत्रों मरावे ह्या उद्देशाने आलेले गरीब लोक राहतात. तसे कांही शास्त्राध्ययन करणारे विद्यार्थीही राहतात. ह्या देवळापासून जवळच भागीरथीच्या तटाकास एक घाट आहे. त्याला संकटाघाट ही संज्ञा आहे. ह्या घाटावरच महावीराचे देवालय आहे. संकटा घाटाच्या उत्तरेस राम- घाट आहे. येथे जितके घाट आहेत तितके प्रायः राजे लोकांनी आणि महाजन लोकांनी बांधलेले आहेत व दरएक घार्टी एकेक शिवालय आहे. आतां आम्ही कंटाळलो. हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता.

पिशाचमोचन.

मु० श्री वाराणशी ता०

जानेवारी १८७२.

ज्ञानप्रकाशकर्ते यांसः-
 वि० वि०. आम्ही विक्षिप्त आणि आतां तुम्हास काय म्हणूं? आम्ही विक्षिप्त कसे म्हणून प्रश्न कराल तर सांगतो ऐका. आम्ही काल पर्वों तुमच्याकडे दोन पत्रे रवाना केली त्यांतून "मानमंदीर" आणि “दशाश्वमेध" ह्या मोहोल्याची हकीकत तुम्हास लिहून क ळविली आणि आज त्या क्रमाने म्हटले म्हणजे "बंगाली टोला" मोहोल्याची काही माहिती तुम्हास ल्याहावी, तसे न करितां आज आम्ही तुम्हास “पिशाच मोचना" कडील वाराणशीच्या भागाची हकीकत लिहिणार अतएव विक्षिप्त अस्तु.
 ह्या क्षेत्राच्या पश्चिम सोमेवरच कां म्हणाना "पिशाच मोचना- चें" मोठे तळे आहे. ह्यांतील उदक संचयास विमलतीर्थ असे नांव आहे. ह्या सरोवरास चोही बाजूनी घाट बांधलेले आहेत. जो घाट दक्षिणोत्तर जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला आहे त्यावर देवळे आहेत. जे यात्रेकरू श्री वाराणसीस यात्रेस येतात त्यांस येथे येऊन स्नान व श्राद्ध करावे लागते. येथे एक त्रिपिंडी श्रा-