Jump to content

पान:काशीयात्रा.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५१

गास त्रिवेणी संगम केल्याचें फल मिळेल असा वर दिला. ब्रम्ह देवानी नंतर एक दशाश्वमेधेश्वर महादेव आणि दुसरा ब्रम्हेश्वर म हादेव अशी दोन लिंगे स्थापिली दशाश्वमेवेश्वराचे लिंग फार मोठे गंडकी शिळेचे आहे. सुमारे घेर ६ फूट असून उंची ४ फू- ट आहे. ब्रम्हेश्वराचें लिंग इतके मोठे नाहीं. दशाश्वमेधेश्वराच्या आ- राधनेने नरदेह धारण करणाऱ्या प्राण्यास जन्ममरणापासून मुक्ती आहे, आणि ब्रम्हेश्वराच्या आराधनेने ब्रम्हलोक प्राप्ती आहे अशी क- था आहे. ह्या देवालयांतून पुष्कळ दुसरी लिंगे स्थापन केली आ- हेत. त्यांस रांगडे लोक कचेरी असे म्हणतात. दशाश्वमेध घाटों आणि तेथेंच रुद्रसर ह्या नांवाचें कुंड आहे तेथें दशाहारांत स्नानाचें विशेष महात्म आहे. ज्येष्ठ शुद्ध १५ च्या स्नानाचे फल तर फारच मोठे आहे.
 ब्रम्हदेवाचे अश्वमेध संपल्यावर शंकराच्या कामाचे त्यांस पुनः स्मरण झाले म्हणून पुनः ते विचार करूं लागले. तो त्यांस कांहींच युक्ती सुचेना व दिवोदासाचा अपराधही त्यांस कांही आढळेना, तेव्हां त्यांनी वाराणशीसच राहण्याचा निश्चय केला.
 सिद्धेश्वरी महल्यांत एक सिद्धेश्वरीचे आणि दुसरे संकटा देवीचें अशी दोन देवालये आहेत. सिद्धेश्वरीच्या देवळालगतच चंद्रकूप म्हणून जो प्रसिद्ध कूप तो आहे. ह्या देवालयास दोन चौक आहेत त्यांपैकी एकांत हा कूप आहे. चैत्र शुद्ध १५ स चंद्रकूपाची यात्रा मोठी भरते आणि कोणत्याही महिन्यांत सोमवारी पौर्णिमा आली तर तेथे मोठा मेळा जमतो. ह्या कूपांत पिंडदानाचे मोठे फल आहे. याच चौकांत दुर्गा देवी आहे. ती चतुर्भुज आहे.एका हातांत कमल दुसऱ्या हातांत तरवार तिसरा हात सिंहावर आणि चवथा हात रेल्यावर असे आहेत. ह्या देवळा मागे सिद्धेश्वरीचे देवालय आहे. ही देवी सकल कार्यांची सिद्धिदायका आहे म्हणून सर्व लोक हिची आराधना करितात.
 संकटा देवी ही सकल संकटाची परिहर्ती आहे. हे देवालय