Jump to content

पान:काशीयात्रा.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०

परत येत नसे. कोणास ते क्षेत्र सोडावे असे वाटेचना, आणि शंक- रास तर तेथील कांहींच वृत्त कळेना. अशा संकटांत सांपडले अ सतां काय करावे हा विचार करूं लागले. त्यांचे मन ह्या विचारांत निमस असतां ब्रह्मदेवास श्री वाराणशीस पाठवून शोध आणवावा ह्मणून उमेने सुचविलें. तेव्हां महादेवानी ब्रह्मदेवास बोलावून आणू न सांगितले की, तुम्ही वाराणशी क्षेत्री जाऊन तेथील वर्तमान घे- ऊन यावे. नंतर ब्रम्हदेव हंसारूढ होऊन वाराणशीस गेले. तेथे दाखल झाल्यावर त्यानीं सर्व क्षेत्रभर पर्यटण केले. सर्व देवांची दर्शने घेतली. नंतर त्यांस तेथे अत्यंत आनंद झाला आणि तें क्षे- त्र सोडून जाण्याची वासना त्यांस होईना. तेव्हां त्यानी आपणास राहण्याकरितां दशाश्वमेधचें स्थल निवडले आणि तेथे एका वृद्ध ब्राम्हणाचें रूप धारण करून स्वस्य राहिले. परंतु शंकरानी जे काम त्यांस सांगितले होते त्याचा त्यांस विसर पडला नाही. दिवोदास राजाच्या नित्य कृत्यांत अगर दानधमीत कोठे तरी व्यंग काढावे ह्या हेतूने ते शोध करूं लागले. तो त्यांस न्यून कोठें- च दिसेना. नंतर ब्रम्हदेवानी अश्वमेधसामग्री राजाजवळ मागितली. ती अशी की, २७ कुंडांचें उदक, सत्तावीस वृक्षांच्या पालवी, ह्या प्रमाणे सर्व सामग्री दरएक जिलस सत्तावीस सत्तावीस ठिकाणचे असे आणून दे म्हणून म्हणतांच राजाने त्यांस उत्तर केले की, महाराज एक अश्वमेव सामग्री तर काय, परंतु दहा अश्वमेघांची सामग्रीची तयारी ठेवितों. आपण स्वस्थ आश्रमास चलावे. नंतर ब्रम्हदेव गंगातटाकी आले आणि स्नानसंध्यादि नित्य क्रम त्यानी सुरू केला. नंतर राजाने दहा अधनेवांची सामग्री ब्रम्हदेवास पाठ- विली. ते सर्व जिन्नस त्यानी तपासून घेतले तो त्यांस एकही न्यून आहे असे दिसले नाही. यामुळे त्याची मर्जी फारच संतोष पावली आणि त्यांनी दहा अश्वमेध केले. ज्या स्थली ब्रम्हदेवाचे हे दहा अश्वमेध झाले त्या स्वास त्यांनी दशाश्वमेध हे नांव देऊन त्या नागी जो कोणी तीर्यवीचे वगैरे कर्म करील त्यास ती कमै प्रया-