Jump to content

पान:काशीयात्रा.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२

के अदमी कोठडीमें केसे आने सकते है. लेकिन फोरन सबकु हकाल देव" मग पात्रेकऱ्याची काय विचारतां फजिती "अर्ध चंद्रेण राघवः” ही स्थिति प्राप्त होते. अशा प्रकारे बाहेर आ- ल्यावर यात्रेकरी स्टेशन मास्तराकडे जातो, तेथें त्यास आम्हास दरजा देण्यास बाबूस हुकूम द्या म्हणून बोलावयास जातो तो सा- हेत्र आम्हास नोटिस दिल्याचे स्मरण नाहीं असे स्वच्छ सांगतात. मग येत बाबूशीच गांठ. मग शिपाई बोवा मध्ये येऊन म्हण तात की, हम तुमको दरजा करवाय देते, तुम कुचतोची बाबूकू देव." असे बोलून त्यास बाबूकडे नेतो.आणि त्यांस सांगतो कीं, "बाबूजी इनको दरजाका पास करदेव और तुम आपना दस्तुरी लेव" मग बाबू तेव्हांच ताळ्यावर येतात. आणि म्हण तात की, अच्छा निकालो रुपय्या. केतने दरजे तुमको होनासो बोलो" मग यात्रेकरी जितके हवे लागतील तितके दरजे मागतो. त्याचा पास बाबू लिहून ठेऊन रुपये पेटींत टाकून स्वस्थपणे टिकिका वाटणे वगैरे काम करूं लागतात. इकडे जो जो गा- डी स्टेशनावर येण्याची वेळ होते तो तो यात्रेकरू बावाची जी बा- हेर परिवार मंडळी असते त्यांच्याजवळ टिकीट वगैरे कांही नसतें म्हणून रेल्वे स्टेशन पोलिसाचे लोक त्यांस धक्का बुक्की करण्याच्या वेतांत येतात. आणि हे गृहस्थ तर आंत अडकलेले असतात. पासाचे रुपये भरून चोरासारखे उगीच उभे राहिलेले असतात; कारण बाबूसाहेबांची मर्जो दुखावेल. मग हळूच धीर करून बोलूं लागतात की, "बाबूजी मेहरबानी करके पास देव, अशा प्रकारें तीन चार वेळां चार चार मिनिटांच्या अंतराने कृत्रिम बाबूजींची प्रार्थना केल्यावर बाबूजीच्या मुखावाटे मुक्ताफळे कोसळतात की, दरजेके पीछे हम दो दो रुपय्या लेयेंगे. अशा प्रकारची आकाश- वाणी झाल्यावर यात्रेकरू कांहीं बोलण्याचा यत्न करणार, इतकें त्या अंतरसाक्ष बाबूस कळतेच. मग तत्काळ बाबूजीकडून आपो आपच उत्तर मिळते की, हं एक पाइ कम लेनेके नहीं." मग