जितके दरजे घेतले असतील त्याप्रमाणे प्रत्येकास रुपये दोन दोन
प्रमाणे बाबूच्या पायावर अर्पण करून पास घेऊन बाहेर येतात तो
शंकासुराची गांठ पडते. ते लागलीच सवाल करितात की,
'" शिपाईकी दस्तुरी 1 दरजा दिये बिगर दरजा नहीं खोला जाय-
गा" आणि गाडी तर स्टेशनावर थोडा वेळ उभी राहते तेव्हां
पटा पट पावल्या टाकून गाडी उघडून घेऊन माणसे आंत घाल-
ताहेत तो लगेज वगैरे कांहीं वजन झाले असते त्याच्या पासाची
बोंब उडते. लगेज वजन करणाऱ्या बाबूची पाद्य अर्ध्यादि पूजा
केल्याशिवाय लगेजचा पास तर मिळणेंच नाही.बरे ती पूजा
करून जो पास घेऊन गाडीत बसावयास जावें तो लगेज्याच्या बो-
जावरून लेबल मारणारा शंकाशूर हातांत पांच सहा लेबल व गों-
दाची करटी घेऊन सलाम करिता आणि म्हणतो की, "क्यों हम
लेवल नहीं लगाना" तेव्हां यात्रेकरू बावा प्रश्न करितात "क्योंकि-
सवास्ते नही लगाते, तेव्हां त्यांचे छापिल उत्तर येतें कीं, हमारी
दस्तुरी काहा है" मग यात्रेकरू बाबा म्हणतात की, बाबा आतां
तुला तरी काय देऊं? मग शिपाई बावा बोलतात कीं, "हंम आठ
आणे लेंगे. मग त्यांच्या हातावर तितकी रक्कम टाकिल्यावर रिज-
र्व केलेल्या दरजास लेबल मारणारा येतो. त्याचीही कथा सदहूप्रमा-
णे. अशा प्रकारे यात्रेकरू बावाची पिशवी बरीच खाली होते.
आणि इतकी भुतावळ संपून जर स्टेशनावर कांही वेळ गाडी
उभी राहिली तर वशिल्याने प्लाटफार्मवर आलेले भिकारी लो-
कांची गांठ पडते आणि गाडी निघे पावेतो त्रास देतात.
सर्व कृत्यांत अशी कांहीं जिकीर होते कीं, जो गाडीचा पास
काढण्याच्या वेळेपासून डोके दुखण्यास आरंभ होतो तो डोके
उतरण्यास गाडी चालू झाली तरी दोन तास पुढे काळ
लागतो.
ह्याप्रमाणे पास काढणे झाल्यास अगर रिटर्न जर्नी टिकिट
घेणे झाल्यास यात्रेकऱ्यास दुःख मानसिक व शारीर संबंधी सो-
पान:काशीयात्रा.pdf/४६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३