पान:काशीयात्रा.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ळच हिंदूनी नवें विश्वेश्वराचे देवालय बांधिले आहे. ह्या देवा- लयाचे काम जुन्या चालीच्या देवळाप्रमाणे आहे. ह्या शिवालया- चें शिखर देवळाच्या भिंतीच्या वरल्या गलथ्यापासून तो वरच्या कळसापावेतों सोन्याने मढविलेले आहे. ह्या देवालयाच्या उत्तरेस ज्ञानवापि तीर्थाचा कूप आहे. जशी विश्वेश्वराच्या देवालयावर महजीद बांधली आहे तद्वतच बिंदुमाधवाच्या मुळच्या देवळावर एक भली मोठी महजीद सदर पादशहाने बांधिली आहे.ह्या महजिदीस दोन मनोरे आहेत. प्रत्येकी महाजदीच्या चौत्र्यापासून १२५ फूट उंच आहेत. ह्याजवर चढून काशी क्षेत्र पाहूं लाग- ले ह्मणजे जो काय मौजेचा चमत्कार शहरांतील इमारतीचा दृष्टीस पडतो तो अनेर्वाच्य आहे. ह्या महजिदीजवळच हल्लींचें श्री बिंदुमाधवाचे देवालय आहे. आणि ह्या देवालयाजवळच पंचगंगेचा घाट आहे. ज्या बिंदुमाधवाच्या मूर्तीचा उच्छेद औरंगजेबाने केला. ती मूर्ति हल्ली एका सावकाराच्या येथे आहे. तिचे दर्शन सकाळी प्रहर दिवस पावेतों होतें. धुंडिराज विनायकाचे देऊळ श्री विश्वेश्वरा- च्या देवळाजवळच आहे. दंडपाणी हे विश्वेश्वराच्या देवळांत पश्चिमेस आहेत. आर्धी त्यांचे दर्शन घ्यावे आणि मग श्री विश्वे श्वराचे दर्शन घ्यावे. कालभैरव हे काशिकापुरीचे कोतवाल काशीचे देऊळ भैरवाच्या देवळापासून बरेंच लांब आहे. ह्या देवीला तेथील लोक वन्दे काशी म्हणतात.ह्या देवळाच्या जवळच गुहा आहे आणि तेथून थोड्याच अंतरावर गंगा ह्या नां. बचा एक तलाव आहे. भवानीचे देवालय धुंडिराजाच्या देवळा. जवळ आहे. गंगेच्या काठी एक घाट आहे.ह्या घाटानजी- क जो गंगेचा भाग आहे त्यास मणिकर्णिका हें नांव आहे.ह्या नित्य यात्रेच्या देवतांचे दर्शन यात्रेकऱ्याने “विश्वेशं माधवं धुंडिं दंडपाणिच भैरवं ॥ बन्दे काशी गुहां गंगां भवानी मणिकर्णिकां" ह्या श्लोकाच्या अनुक्रमानें घेतले पाहिजे. येथे त्या नित्य यात्रेखे- रीज आणखी अतर्गृही, दक्षिण मानस, उत्तर मानस, पंचतीर्थ