Jump to content

पान:काशीयात्रा.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६

वाहून गेलें. ते सर्व पुनः करण्याचा क्रम जारी आहे.जी- बनपूर फार मोठे शहर होते, परंतु सालमजकुरच्या अति वृष्टीनें त्याची इतकी खराबी झाली आहे कीं, गांवांपैकी दहा आणे भा- गांतील इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. जीवनपुरास बेलि. याचें तेल फार चांगलें पैदा होतें, परंतु यंदा तेथील बेलियाच्या फुलाच्या बाड्यांतून पाणी शिरून फारच नुकसान झाले आहे, ह्या- मुळे यंदा बेलियाच्या तेलाची अम्मळ चणचण होईल असे लोक ह्मणतात.
 अयोध्येपासून ६ कोसांवर नंदिग्राम आहे. तेथे भरतानें तप- श्रर्या केली. हे ठिकाण पाहण्यासारखे आहे. ह्याचप्रमाणें अयोध्येपासून सुमारे १८/२० कोसांवर नैमिषारण्य आहे. (ह्या- स इकडील लोक निमसार ह्मणतात) हे ठिकाण सत्ययुग तपश्च र्येचें स्थान होते आणि सूतानी शौनकादि ऋषीप्रति पुष्कळ पुराणे इतिहास वगैरे कथन केली आहेत. हेही वन एडिटरराव पाह- ण्यासारखे आहे.
 आम्ही अयोध्यापुरीहून परत लखनौ व कानपूर मार्गे श्री वारा- णसीस आलो. वाराणसी है क्षेत्र आशी आणि वरुणा ह्या दोन नद्यांचे संगम भागीरथीशी झाले आहेत त्यांच्या मध्ये आहे.अशी- चा संगम भागीरथीशी वाराणशीच्या दक्षिण सीमेवर झाला आहे, आणि वरुणेचा संगम उत्तर सीमेवर झाला आहे. त्याच शब्दाचा हिंदुस्थानी भाषेत बनारसी अथवा बनारस हा अपभ्रंश झाला आहे असे अनुमान होतें. ह्या क्षेत्राचें काशी हेही नांव दक्षणी लोकांत प्रसिद्ध आहे.
 विश्वेश्वर, बिंदुमाधत्र, धुंडिराज गणपति, दंडपाणी, भैरव, का शी, गुहा, गंगा, भवानी आणि मणिकर्णिका ह्या मुख्य देवतांची नित्य यात्रा यात्रेकऱ्याने करावी लागते.
 पहिले जे काशी विश्वेश्वराचे देवालय आहे त्यावर औरंगजेब पादशहानें एक मोठी महजीद बांधिली आहे, म्हणून त्याच्या जव