Jump to content

पान:काशीयात्रा.pdf/३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२८

आहे. आंतील कबरा दोन ठिकाणी आहेत. एक वरच्या मजल्यावर आणि दुसरी तळमजल्यावर. येथे जे वेलबुटीचें खोदीव काम आहे त्यांत कारागिरीची आणि पैसा खर्चण्याची हद्द झाली आहे. ह्या ताजाच्या एका आंगास निमाज पढण्याकरितां एक सोपा बांधलेला आहे. त्यांत ६ हात लांब आणि ३ हात रुंद असे एकेक आसन संगमरवरी पांढरा दगड आणि दुसरा तसाच गुळगुळीत तांबडा दगड ह्याची एकेक महिरप अशी हजार आसने केली आहेत. ह्यांत यमुनेचा पाट आणून जलक्रीडेकरितां एक बावडी बांधली आहे. तिला चार मजले इमारत वाटोळी बांधलेली आहे. ती फार चमत्कारिक आहे. ह्या ताजमहालांतील बगीच्याची व्यवस्था सरकाराने इंजनेर खात्यांतून बरीच ठेविली आहे.
 येथें त्याच नमुन्याची दुसरी इमारत यमुनेच्या काठी नूरजहानच्या दिवाणानें बांधली आहे. तीही पाहण्यासारखी आहे.
 आग्र्याच्या किल्यांत मोतीयहजाद वगैरे इमारती आहेत. त्या सर्व अनुपम्यच आहेत. किल्यांत एका ठिकाणी स्नानाची जागा केली आहे. तेथें यमुनेच्या पाटाचे पाणी आणून दरएक स्नानाच्या जाग्याच्या सभोंवती पाट फिरविले आहेत. हे सर्व काम संगमरवराचें आहे. सारांश माती आणि विटा प्रमाणे संगमरवर येथे झालेला आहे. आग्र्यास रेल्वेचें स्टेशनही विटांचे फार चमत्कारिक रीतीचे बांधलेले आहे.
 येथील लोक दगडी कोरीव व कलाबतूचें काम फार चांगले करितात. मला असे वाटते की, प्राण्याने जन्मास येऊन आपल्या डोळ्याचे सार्थक करणे असल्यास एकवार तरी येथे येऊन ह्या सर्व इमारती पाहाव्या म्हणजे त्यास जे समाधान होईल तें अवर्णनीय आहे. येथे सत्रंज्या, हिंदुस्थानचें वगैरे भरजरी कापड फार चांगले होते.
 येथे कोहळा आणि साकर ह्यांचा पाक करून पेठा म्हणून