एक पदार्थ करितात तो खाण्याला फारच चांगला लागतो. व
तसा पेठा दुसरा कोठेंही बनत नाही. येथे एकंदर ७-८ द-
क्षणी ब्राम्हण आम्हास स्थाईक असे आढळले. राजा दिनकरराव
साहेब हेही येथेंच वाडा बांधून राहिलेले आहेत. ह्यांचेंच मात्र येथे
नांदते दक्षणीचे घर आहे. हे गृहस्थ ह्या प्रांती फार इभ्रतदार
आहेत. आतां पत्रविस्तारास्तव पुरे करितों.
तुमचा मित्र एक फिरस्ता
.
ज्ञानप्रकाशकर्ते यांसः -
वि०वि०. गेल्या पत्री आपणाकडे आग्रा शहरची थोडीशी
हकीकत लिहून पाठविली. आतां आग्र्याहून आम्ही कानपूर वगैरे
कडे गेलो तिकडील कांहीं माहिती लिहून कळवितों.
आग्र्याहून आम्ही पहाटेस तीन वाजतां रेल गाडींत स्वार
झालो तो सुमारे साडेदहा वाजतां सकाळी कानपूरच्या स्टेशनावर
दाखल झालों. कानपूरच्या स्टेशनाजवळ शिंदे सरकारची मोठी
धर्मशाळा दक्षणी लोकांकरितां उतरण्यास बांधली आहे. तेथें
कांहीं लोक उतरतात. कित्येक गंगापार जाऊन लखनौस रेल
गाडी जाण्याचें जें स्टेशन आहे तेथे उतरतात. गंगापार उत
रख्याने यात्रेकऱ्यांांस गंगेचें उदक स्नानास मिळते. आणि कान-
पुराहून लखनौस जी गाडी सकाळी आठ वाजतां जाते ती
साधण्यास बरें पडतें.
कानपुराहून चवदा मैलांवर ब्रम्हावर्त आहे तेथे शिघ्राम गाडीत बसून
गेले म्हणजे सुमारे दोन कलाखांत मनुष्य पोहोचते. जातां येतांचे भाडे
२०८ पडतें. हें वाल्मिकीचे आश्रमस्थान आहे. येथे श्रीमंत
कैलासवासी बाजीराव रघुनाय पेशवे राहत होते. त्यांच्यामुळे द-