पडली होती. ती सर्व आम्ही पाहून आम्हास मोठे वाईट
वाटले.
ह्या शहरांतील बाजारच्या रस्त्याची बांधणी मथुरेच्या बां
धणीप्रमाणेच आहे, परंतु बाजार मोठा, पेठा दोन दोन
मैल लांब, दुकानें दाट असे कांही हे शहर चमत्कारिक आ-
म्हास वाटले. इकडे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इत्यादि
पाहिजे तो व्यापार करितात. तुम्हास थोडकेंच उदाहरण
देतों कीं, म्यां ज्या दुकानी कलावतूचा कातडी जोडा वित
घेतला तो दुकानदार क्षत्रिय होता. येथे लोक शुद्ध उर्दु
भाषा बोलतात. पेहेराव अनेक तऱ्हेचा विचित्र आढळतो व
त्यांत प्रतिबंध नाहीं. आज तुम्ही पागोटें घाला, उद्यां टोपी,
परवां पटका, तरी लोक हसतील असे वाटत नाहीं.
आग्र्यास प्रवाशाने पाहण्यासारिख्या ज्या इमारती आहेत
त्यांत ताज म्हणून जी इमारत आहे त्या सारखी इमारत माझ्या
पाहण्यांत आज पावेतों एकही आली नाहीं.
ह्याच्या दरवाज्यांत प्रथमतः गेले म्हणजे ताजावर जीं मा-
णसे उभी असतील त्यांच्या उरापासून वरचे भाग दिसतात.
दरवाज्यांतून आंत गेले म्हणजे चोहोकडून महिरपदार कमा-
नीचे दुजोडीचे सोपे नजरेस येतात. नंतर आंतील दरवाज्यांत
गेल्यावर सभोती नाना तऱ्हेचे वृक्षांनी सुशोभित झालेली अशी
बाग दृष्टीस पडते. ह्या बागेत फळझाडे आणि फुलझाडें नाना
त-हेची आहेत.हा ताज नूरजहान बेगम होती तिनें बांधि-
ला आहे. ही पांच मजले प्रचंड इमारत सर्व संगमर-
वरी दगडांची आहे. ह्या इमारतीत सर्व सामग्री व
र्षाच्या बेगमीची घेऊन ५० हजार मंडळी खुशाल नांदेल
असा अंदाज आमचा झाला आहे. ह्यांत नाना तऱ्हेचे वेल
वेगवेगळ्या रंगानें दगडाचे खोदून केले आहेत. ह्याबद्दल
कल्पना करण्यांत ज्यानें ही इमारत पाहिली नाहीं त्यास अशक्य
पान:काशीयात्रा.pdf/३०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे