जरी त्याच्या पंथांत गेला तरी तो घेई. असे त्याने केल्यापासून शीख लोकांस राष्ट्रत्व आले असे जरी आहे तरी ते हिंदूच्या सर्व देवांची भक्ति करितात; त्यांचे सर्व सण पाळितात, त्यांचीच काय ती ह्यांस वाचावयास पुस्तकें, आणि ते ब्राम्हणास मोठा मान देतात. ह्यावरून हे स्पष्ट होते कीं, जरी त्यांनी जातिभेद मोडला व वेद पुराणे वगैरेबद्दल दशवादशहाका ग्रंथ वाचूं लागले तरी आपण मुळचे हिंदूच आहोत हे त्यांच्या मनांत पक्के ठसले आहे. दशपादशहाका ग्रंथ गुरुगोविंदानें केला व तो नानकापासून दहावा उपदेशक झाला म्हणून त्या ग्रंथास दशपादशहाका ग्रंथ म्हणू लागले. गुरुगोविंद अठराव्या शतकाच्या आरंभी प्रसिद्धीस आला.
ह्या लोकांच्यामध्ये आणि उदासींच्या मध्ये फारसे अंतर नाहीं. वास्तविक पाहिले तर नानकानें जो धर्म सांगितला त्याप्रमाणे हेच लोक यथार्थ आचरण करितात असे म्हटले पाहिजे. त्यांचे नांव निर्मळवधी हे आहे म्हणजे नानकापासून आलेल्या धर्मांत भेसळ न होऊं देतां मुळच्या धर्माप्रमाणे वागणारे ते जगांतील दूषणापासून आपण अलग आहोत असे ते सांगतात, व निरंतर धर्म आचरणामध्ये काळ घालवितात. ते लग्न करीत नाहींत व प्रायः अल्प वस्त्रे परिधान करितात. ते उदासी पंथाच्या शीख लोकांप्रमाणे संगतींत जमून राहात नाहीत व ईश्वर भजन करण्याचा त्यांचा एक विवक्षित मार्ग नाहीं. नानक, कबीर वगैरे दुसरे एकेश्वर वादींच्या ग्रंथाचें वाचन मनन करून ते ईश्वरार्चन करितात. हे लोक आपल्या शिष्यांपासून उपजीविका करितात. ते वेदांत शास्त्रांत