पान:काशीयात्रा.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५

पारंगत असतात. ह्या पंथाचे लोक फार नाहीत तरी मोठ- मोठ्या शहरांतून व विशेष करून काशींत कांही आढळतात.

नाग.

नंगे गोसांवी म्हणून शेवामध्ये आणि वैष्णवांमध्ये आहेत त्याप्रमाणेच शीख लोकांमध्येही आहेत. त्यांत आणि ह्यांत भेद इतकाच कीं, पहिल्या दोन पंथांचे लोक हत्यारे बाळगितात ब हे लोक त्यांस शिवत देखील नाहीत, परंतु स्वस्थ एकांत वा सांत ईश्वराचें स्तौत्य करून काळक्षेप करितात. हे नम फिरतात आणि निर्मळ पंथी अल्प वस्त्र परिधान करितात. ह्या खेरीज उभय पंथाच्या लोकांमध्ये कांहीं फरक दृष्टोत्पत्तीस येत नाहीं.

आग्रा.

मुक्काम वाराणशी ता० २८ दि० १८७१

ज्ञानप्रकाशकर्ते महाराज, नमस्कार.पंजाबांतील लोक दक्षणिपेक्षा स्वभावानें शर असावे असे आम्हास वाटतें. इकडे ज्ञातिभेद नांवाचा आहे असे म्हटलें तरी चालेल, आतां माझ्या ह्या लिहिण्याचा अर्थ म्हणजे कांहीं सर्व ज्ञातींचा विवाहव्यवहार अथवा पंक्तिव्यवहार होतो असा समजतां कामा नये. परंतु आमच्या तिकडे जसा स्पर्शास्पर्शाचा वि टाळ मानतात तसा इकडे बिलकुल मानण्याचा प्रघात नाहीं. हलालखोर घरांत सर्व वागण्याच्या जिन्याच्या चौथ्या मजल्या- पर्यंत जातो. स्म करण्याच्या संप्रदायांत ज्याची त्याची मर्जी पुष्कळांशीं काम करिते. कोणीं कल्लया मधील नुसती दाढीच मात्र काढवितो, कोणी कपाळावर नुसता एक तीन बोटाचा