पान:काशीयात्रा.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३
सुध्राशाही.

 वर सांगितलेल्या दोन पंयांच्या लोकांपेक्षां सुभाशाही पंथाचे लोक चोहीकडे पुष्कळ आढळतात. ह्यांच्यामधील धर्मोपदेशक आपल्या कपाळास उभी काळी रेघ लावितात आणि हातांत एक हात लांबीच्या दोन टिपऱ्या घेऊन त्या तालावर वाजवून गाणी गातात आणि भिक्षा मांगतात. हे लोक आपले अयुष्य असद् मार्गाने घालवितात. ह्या लोकांत प्रतिष्ठा नाहीं व ते हमेशा जुवा खेळतात, दारू पितात आणि चोऱ्या क रितात. गुरुगोविंदाचा बाप तें घर बहादूर हा आपल्या धर्म पंथाचा उपदेष्टा असे ते मानितात.

गोविंदसिंही.

पंजाबामध्ये जे शीख लोक आहेत व ज्यांचे वर्चस्व राष्ट्राच्या गणनेत आज पावेतों होत आले आहे. ह्याच्या पैकी बारा आणे लोक ह्या पंथाचे आहेत. जरी नानकोपदिष्ट धर्म हे मानितात व नानकास मोठा मान देतात तरी त्याने जी शांती घरावी, क्षमा करावी, दया बाळगावी इत्यादि नियम सांगितले आहेत ते सर्व ह्यांनी एकीकडे गुंडाळून ठेविले आ- हेत आणि समशेर बहादर होण्याकरितां हे तरवारीची भक्ति करूं लागले आहेत. ह्या पंथाची स्थापना गुरुगोविंदानें केली.आणि ती हिंदू आणि मुसलमान ह्यांजवर कशी चालवावी तो उपदेश केला.गुरुगोविंदाने आपल्या शिष्यांस दाढी व मिशा राखण्याची परवानगी दिली व नि॑िळा पोषाग घालावा म्हणून हुकूम दिला. त्याने गौमांस खेरीज करून सर्व प्रकारचे मांस भक्षण्याची मोकळीक दिली व जातिभेद मोडून टाकिला. हिंदू अथवा मुसलमान कोणीं