शाईचा आहे. सोने आणि चांदी येयें लोखंडाप्रमाणे खर्च केली आहे. छताच्या कामाची पतलावण बेहद्द कारेगिरीची आहे.
येथील बगीचे म्यां पाहिले तेव्हा मला असे वाटले कीं, धन्य आहेत हे लोक. आम्हा लोकांस बगीच्या अगोदर नको आणि तशांत कांही नाद असला तर त्याचे ज्ञान नाहीं असे म्हटले तरी चालेल. अस्तु. येथे मुख्य महात्म म्हटले ह्मणजे अमृत सरोवरी स्नान करण्याचे आणि गुरु नानकाच्या समाधीचे दर्शन घेण्याचे आहे. इकडे मेवा मिठाईची गर्दी हो. आतां झोप येते सबब पुरे करितों. लोभ असावा हे विनंती.
मुक्काम वाराणशी. ता० २० डिसेंबर १८७१.
ज्ञानप्रकाशकर्ते यांस:-
वि० वि०. काय सांगू अमरसरच्या गुरु नानकाच्या मंदिराची शोभा. या मंदिरास दरबार म्हणतात, हे मी पूर्वीच्या पत्र लिहून कळविलेच आहे. आतां ह्या मंदिरास पांच मोठाले कळस आहेत. ते आपल्या पर्वतीच्या देवालयाच्या कळसापेक्षा प्रत्येकी तिपट मोठे असून त्यावर सोने चढविले आहे. सारांश सोने रुपें येथे कांहींच पदार्थ नाहीं, असे त्या काली होते असे मानणे भाग आहे.
ह्या मंदिराचे अद्यापि काम चालले आहे. तटाच्या दोन बाजूनी संगमरवरी दगडाचा कटा आहे. बाकी दोन बाजूचें काम सुरू आहे. ह्याप्रमाणे स्थिति आहे.
अमरसरापासून दक्षिणेस ३२ मैलांवर लाहोर आहे. हे शहर बारा कोस घेराचें आहे. ह्याच्या सभोवती जे बगीचे आहेत ते अवर्णनीय आहेत. कित्येक बगीच्यांतून ६ ऋतूंत जे वेगवेगळाले मेवे उत्पन्न होतात ते पिकतात. वसंताचा वाफा वेगळा. ग्रीष्म ऋतूचा वेगळा. ह्याप्रमाणे सर्व काळचे वाफे दहा बिघ्यांचे केलेले आहेत. काय सांगावें एके ठिकाणी तर असा चमत्कार दृष्टीस पडला की, पलं-