Jump to content

पान:काशीयात्रा.pdf/२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१९

गावर बिछाना घालून तोंडाने झाडाची नाना तऱ्हेची फळे खावीं, अशी कांही चमत्कारिक योजना केलेली आहे. सर्व काही विलक्षण आहे. लाहोर हें रावी नदीच्या कांठी आहे. ह्या नदीचे जे कालवे काढलेले आहेत ते प्रत्येकी नदीच्या बरोबरीचे आहेत असे म्हटलें तरी चालेल.
 लाहोरांत पाहण्यासारख्या इमारती म्हटल्या म्हणजे वजीरखानाची महजीद, बारद्वारी, जाहांगीरचा मुकरबा इत्यादि आहेत. वजीरखानाच्या महजिदीत सोनेरी शाईने सर्व कुरान लिहिले आहे. बारद्वारीचे काम सगळे संगमरवराचे आहे. ह्या इमारती पाहिल्या म्हणजे चित्तास फारच आनंद होतो.
 पंजाबाच्या सरहदीवर मुलतान प्रांत लागतो. त्यांत मुलतान हे गांव पाहण्यासारखे आहे. येथे नरसिंह अवतार झाला. जेथे नरसिंह खांबांतून निघाला तें स्थान व प्रल्हादपुरी ह्या जागा हिंदु लोकांस पाहण्यासारख्या आहेत. इकडे आज पावेतों बैराग्यांवांचून कोणी यात्रेस आले नाहीत अशी खबर मिळते.
 मुलतानांत शाशमततबरेल नामक मठी आहे, ती पाहण्यासारखी आहे. ह्याप्रमाणेच अकबराची महजीद वगैरे पाहण्यासारखी आहे. पत्रविस्तार भयास्तव पुरे करतों. लोभ असावा हे विनंती.

एडिटराचा मित्र एक फिरस्ता



शीख लोकांचे धर्म.

 पंजाबामध्ये जे शीख लोक आहेत त्यांचे नानकशाही, उदासी, गंजभक्षी, रामराई, सुथ्राशाही, गोविंदसिंही, निर्मळ, आणि नाग, असे अनेक पंथ आहेत. हे सर्व पंथ नानाकशाही पंथाचेच वेगवेगळाले अनेक मठ होऊन त्या मठाधिपतींच्या मताभिमानानें भिन्नत्व पावले आहेत. हिंदु धर्मामध्ये आजपावेतों अनेक आचार्यांच्या मतभेदाप्रमाणे अनेक पंथ उत्पन्न झाले