Jump to content

पान:काशीयात्रा.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७

प्रचंड पूल उतरलो तेव्हां त्या पुलाचे काम पाहून आम्हास परमाश्च- र्य वाटलें. येवढा मोठा पूल हिंदुस्थानांत दुसरा विरळाच असेल. ह्याच सतलज नदीच्या काठी आटक हें खेडें आहे व तेथ पावेतों हिंदू लोकांनी जावें अशी मर्यादा पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी केलेली होती. येथून थोडया कोसांवर पानपत खेडें आहे. त्याच्या जवळच पेशव्यांच्या फौजेची कत्तल उडाली.
 आम्ही अमरसरी पोहोचल्यावर शहर पाहिले तो आम्हास फारच चांगले भासले. ह्या शहरांत लोकरीचा, रेशमाचा, आणि कलाबतूचा कशिदा काढणारे लोक पुष्कळ आहेत. येथे शाल- जोड्या वगैरे लोकरीचे जिन्नस नाना तऱ्हेचे चमत्कारिक मिळतात. ह्याच गांवीं गुरु नानक जो शीख लोकांचा धर्मस्थापक होऊन गेला त्याची समाधी आहे. ती पाहण्यास सर्व विद्याचार संपन्न हिं- दून जाण्याचा यत्न करावा. काय सांगू ! जेथें कबर आहे त्या जाग्याचे वर्णन एडिटर बाबा इतक्या दिवस अरेबियन नाईट मधील वर्णन मला गप्पासारखे वाटत होते, परंतु आतां ती भ्रांती उरली नाहीं. खरोखरीच तें वर्णन यथार्थ आहे; कारण नानकच्या स. माधीच्या इमारतीचें काम त्या वर्णनाप्रमाणे आहे. आंतील संगम- रवरी दगडाच्या इमारतीला “ दरबार " ही संज्ञा आहे व सतलज, बोहा, रावी वगैरे नद्या फारच मोठ्या असल्याने त्यांस मिठ्ठा दरयाव ह्मणण्याची चाल आहे.
 नानकाचे दरबार अमृत सरोवराच्या मध्ये आहे. त्याला एका बाजूने पायवाट संगमरवरी दगडांची बांधलेली आहे.त्या वा- टेवर जे उजेडाकरितां कंदील दुतर्फा लावले आहेत त्यांच्या फ्रेमी सर्व सोने आणि चांदीच्या गिलिटाच्या आहेत. दरबारची सर्व इमारत तीन मजले पावेतों संगमरवरी दगडाची आहे, आणि छ- ताला चोहोंकडे आरसे गालिच्याच्या बुटासारखे बसविलेले असून मध्ये जो वेल काढिला आहे तो सोन्याच्या आणि चांदीच्या