पान:काव्यपीयूष-पुस्तक २ रे.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नंतर पंचम वर्षी मौजीबंधन करावयाळागी । मळविले पुष्कळसे तेजस्वी विप्र जे महा योगी ॥ ३७ ॥ श्रीमत् शंकरकंठीं ब्राह्मण यज्ञोपवीत घालुनि ते । गायत्री मंत्राचा करिती उपदेश वेदवंद्यातें ॥ ३८ ॥ ऐसा व्रतबंधविधी झाल्यावरती करोनि अध्ययन | शिकला गुरुजवळी तो चौदा विद्या कळाहि संपूर्ण ॥ ३९ ॥ नंतर एके दिवशी शंकर आंघोळ ही करायातें । नित्यापरीस गेला होता पूर्णानदीतटाकार्ते ॥ ४० ॥ स्नानासाठीं तो मग निर्मळ सुंदर जळांत जो शिरला | तो एक्या नकानें पाय तयाचा धरोनियां गिळिला ॥ ४१ ॥ या दुष्टानें कैसा हा माझा अर्ध भक्षिला काय । "हे आई, ये झडकरि देवा, आतांकरू तरी काय?" ॥ ४२ ॥ अति दीनवाणि ऐसी ऐकुनि, येवोनियां सती पाहे । तो निर्दय सुसरीने अर्था पुत्रासि मक्षिला आहे ॥ ४३ ॥ हा देवा, हा देवा, ऐसे तो धाय धाय आरडको । ते विपरीत विलोकुनि मूर्छित तत्काळ भूवरी पड़ी ॥ ४४ ॥ होउनि सर्वोचि सावध " देवा विपरीत काय हें केलें। "" हा बाळा, हा बाळा " सुतमुख कुर्वाळुनी असें बोले ॥ ४५ ॥ आई गे हो सावध मजविषय तूं करूं नको शोक । आतां एक तुला मी याचा प्रतिकार सांगतो ऐक ॥ ४६ ॥ संन्यास घ्यावयातें आज्ञा देशिक तरीच हा मातें । सोडील पहा सत्वर, याचें लक्षण अखें दिखे मातें ॥ ४७ ॥ कळवळले चित्त परी दैव सतीचे बळेचि ओढवळे । । झणुनी निरुपायानें भाज्ञा देउनि सुतासि सोडविलें ॥ ४८ ॥ इतुक्यांत मगरही तो, हाउनियां दिव्यकाय भावानें । लागे शंकरपार्थी, यास्तव मुक्ती बरी प्रभावानें ॥ ४९ ॥ होउनि संतुष्ट मनी तत्काळ प्रैषनाम मंत्रासी । उच्च रुनी स्वयें तो शंकर तेथेचि होय संन्यासी ॥ ५० ॥