पान:काव्यपीयूष-पुस्तक २ रे.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करुनी श|तवनातें स्रतिचें संपूर्ण दुःख चाळविलें । देउनि अभिवचनातें, तेणें जननीस फार तोषविलें ॥ ५१ ॥ मग तो तेथूनि निघे आईच्या मागुनी निरोपातें । येई सद्गुरुजवळी सज्जन हो आजि वृत्त परिसा तें ॥ ५३ ॥ संन्यास यथाविधिनें घेउनियां श्रीगुरूचिया हातें । खानंदें स्वीकारी श्रीशंकर परमहंस पदवीतें ॥ ५३ ॥ ज्ञानोपदेश घेउनि गुरुर्ते पूजोनि शंकराचार्य । दिग्विजयार्थ निघाला परमश्रिय ते करावया कार्य ॥ ५४ ॥ नास्तिक वादी जिंकुनि नाना कुमतें समूळ छेदन | शुद्धाद्वैत मताचा केला विस्तर जनीं निवेदन ॥ ५५ ॥ दाउनि सन्मार्गातें करुनी ज्ञानोपदेश सत्कार्ये । केली असंख्य लोकों हिंडुनि सर्वज्ञ शंकराचायें ॥ ५६ ॥ (शा.वि.) घेऊनी अवतार या कलियुगों जेण जनां तारिलें सद्बोधामृत पाजिलें स्वमतही सर्वत्र विस्तारिलें । त्याची जन्मकथा यथामति कवी भावें अशी वर्णितो । ती त्या शंकरपादपंकजरजा वंदोनियां अर्पितो ॥ ५७ ॥ (च. वि.) पाहोनि मूळ चरितामृत सत्कवीचें । श्रीमत् जगद्गुरु कृपाकर शंकराचें ॥ हे जन्मवृत्त रचिले जनरंजनार्थ । सारांश हा कथितसे कवि रंगनाथ ॥ ५८ ॥