पान:काव्यपीयूष-पुस्तक २ रे.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ गगनी आनंदे सुर करिती पुष्पवृष्टि तेव्हां ॥ २२ ॥ तेव्हां उभारिल्या हो रम्य गुज्या आणि तोरणे द्वारों । नाना मंगल वाद्ये वाजविती लोक संमदें भारी ॥ ३३ ॥ हळदी कुंकुम पात्रे भरुनी धांवत सुवासिनी बहुत । ते वेळी सतिसदनी आनंदे पातल्या अति त्वरित ॥ २४ ॥ ते काळ अति जन शिवगुरुच्या मंदिराप्रती मेले । ज्योतिर्विद चिज्जन आणिक शिवभक्त विप्रही आहे ॥२५॥ नंदनमुख आनंदें पहावया पातला त्वरा करुनी । 'झालों धन्य जगीं मो' शिवगुरु ऐसे स्वयें मनीं मानी ॥२६॥ स्नान करोनी केले आर्धी पुण्याहवाचनातें कीं । नंतर मधुबिंदु मुखी घालुनि पुताननासि अवलोकी ॥२७॥ ज्योतिर्विद भूदेव बाळाचे जातकासि वर्तविलें । ते परिसुनि सर्वोच्या चित्तातें फार फार मानवले ॥ २ ॥ नानाविध उत्तमर्शी वस्त्रे, धन, धान्य विप्रवृंदाते । देउनियां जनकानें लाजविले तंब भले भळे दाते ॥ २९ ॥ द्वादश दिनपर्यंतरि करुनी सदनों अपूर्व सोहाळे । शिवगुरुनें ते समयीं सकळ जनांतें बहुत तोषविल ॥३०॥ तेरावे दिवशी मग बोळविल्या हो सुवासिनी ललना । सत्वर समुत्सवात आल्या त्याही सतीचिया सदना ॥ ३१ ॥ त्यावरि खतिनें हर्षे ठेउनि पुत्रासि नामकरणात । पहुडविलें सुंदरशा रत्नजडित पाळण्यांत बाळातें ॥ ३२ ॥ वारंवार मुळातें जो, जो, जो, जो, ह्मणोनि हालविती । लीला जगदीशाची स्वानंद सर्व बायका गाती ॥ ३३ ॥ ओटी सतिची भरुनी वस्त्रालंकार अर्पिले रुचिर । सकलां अवलांनी तो शोभविल। सोहळा भळा सुचिर ॥३४॥ घेउनि हळदी कुंकुम ललना सदनासि आपुल्या गेल्या | साक्षात् शंकर निरखुनि या लोकों धन्य धन्य त्या झाल्या ॥३५॥ लाकन पाळत करुनी प्रेमानें बालकासि वाढविले । त्याचे तिसरे वर्षी ताठानें चौककर्मही केले ॥ ३६॥ AP