पान:काव्यपीयूष-पुस्तक २ रे.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संसारीं सद्धर्मी वर्तत होते महा तपस्वी ते । वृद्धापकाळ आला तरिही झाली न संतती त्यातें ॥ ११ ॥ पुत्रप्राप्तिस्तव मग दोघेही देख नित्य नेमानें । पूजाव्रत स्वयंभू शंभूचें धरिति एक भावानें ॥ १३ ॥ पूर्णानदिचे स्नान प्रातःकाळी करोनियां पाही । श्रीशंकराशि अनुदिनं पूजावें षोडशोपचारांहीं ॥ १४ ॥ •ऐसें कांहीं दिन ते वर्तत असतां महासुखैकरवी । श्रितजनकल्पतरू तो शंकर त्यांचे मनोरथा पुरवी ॥ १५ ॥ सज्जनवंद्य जगद्गुरुं जनहितकर अद्वितीय शंकरसा | होइल पुत्र तुझातें मज्जन हो लौकरी विशंक असा ॥ १६ ॥ साक्षात्कार अवा की एके दिवशी तयासि झाला हो । जगदीशदर्शनाचा शिवगुरु आणिक सतीहि घे लाहो ॥ १७ ॥ नंतर त्याच दिनांती गर्भवती ती महासती झाली । सेवा जगदीशाची सत्वर कैशी पहा फळा आली ॥ १८ ॥ दिवसां मासां हळु हळु तदुपरि तो गर्भ वृद्धितें पावे | तेव्हां त्या दंपतिचा आनंद नभीं मुळीं न सामाने ॥ १९ ॥ भरतोचि पूर्ण महिने प्रसुतिकाळी महा महा ग्रह ते । रवि, शनि, मंगळ आणिक केंद्रस्थानीं बृहस्पती होते ॥ २० ॥ वायु मनोहर वादे झाल्या दाही दिशा प्रसन्न तदा । आकाश निरभ्र दिसे व्यासादि ऋषीहि मानिती मोदा ॥११॥ मंगलदायक वेळीं प्रसवे पुत्रास ती सती जेव्हां १ लाभ. । २ इष्ट लग्नापासून प्रथम, चतुर्थ, सप्तम, दशम या स्थानांची संज्ञा. 3. शंकराचार्योच्या जन्मकाळाविषयी पुढील संस्कृत श्लोक आहे. प्रासूत तिष्यशरदामतियातवत्या- मेकादशाधिकशतोनचतुःसहस्त्याम् । संवत्सरे विभवनाम्नि शुभे मुहूर्ते राधे सिते शिवगुरोर्गृहिणी दशम्याम् ॥ -- अर्थ-गतकली ३८८९ वर्षी (शा.श.७१०) विभवनाम संवत्सरी वैशाख शु. १० मध्यान्ही शुभमुहूर्ती शिवगुरु पंडितांची स्त्री सती प्रसूत झाली.