पान:काव्यपीयूष-पुस्तक २ रे.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीशंकर प्रसन्न. श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्यजन्माख्यान. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ श्रीमद्भगवद्गीता अध्याय ४ श्लोक ८. आय-उपाचे यश परिसाया सज्जनमन सर्वथैव लोभावें । श्रीशंकर पदपंकज शंकर ते वंदितों मनोभावें ॥ १ ॥ श्रीशंकरचरितामृत वर्णन करितों यथामती कांहीं । परि परिसावें आतां दृढभावें हें समग्र रसिकांहीं ॥ २ ॥ सन्मार्ग प्राप्तीस्तव साधक ज्यांचे पर्दी विशंक रते । नरदेहीं अवतरले श्रीभगवत्पूज्यपाद शंकर ते ॥ ३ ॥ पूर्णानदीतटार्की केरळदेशीं वृषाद्रिच्या निकट । शिवलिंगरूप धरुनी श्रीगिरजानाथ जाइला प्रकट ॥ ४ ॥ तैं राजशेखरातें होतां दृष्टांत त्या महीनायें । E लवकरि भति सुंदरसें देवालय एक बांधिलें तेथें ॥ ५ ॥ तत्सन्निध कालटिका नामक तें अप्रहार कीं होतें। त्यामाजी विद्वज्जन नांदत होते कवी महा-होते ॥ ६ ॥ विद्याधिराज नामा होता तेथेंचि एक विप्रवर । प्राक्तनकर्मबळानें त्यातें सुत जाइला कविप्रवर ॥ ७ ॥ त्यांचे शिषगुरु ऐसे ठेवुनि अभिधान त्यास सानंद | प्राणापरि सांभाळी अनुदिनं कृष्णाप्रती जसा नंद ॥ ८ ॥ बाळपणींच सुताचें अद्भुत चातुर्य पाहुनी विप्र । सौख्य मनीं बहु पावे, तो मौंजीबंधना करी क्षित्र ॥ ९ ॥ कम करावें ऐसे शिवगुरुच्या तो मुळीं मनीं नव्हतें | परि आग्रहें पित्याच्या अनुमोदन दे तदा विवाहातें ॥ १० ॥ उत्तम मुहूर्त पाहुनि मघ पंडितराय आपुली कन्या देई शिवगुरुलागी सात नामक जी सति स्वयें धन्या ॥११॥ १ कल्याण करणारें । २ बझ करणारे. | ३ लोकर. । ४ कन्येचा बाप.