पान:काव्यपीयूष-पुस्तक २ रे.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ STEF श्रीशंकराचार्य जगद्गुरूनें। प्रत्यक्ष लोकत्रयतारने ॥ दावोने लीला जन उद्धरीले । त्या श्रीमदाचार्यपदी नमाले पाहोनि तीही बहु दिव्यमूर्ती | चित्तांत नःना सुतरंग येती ॥ या एक मार्गा-परि म्यां धरिले । त्या श्रोमदाचार्यपदां नमीलें ॥ ८ ॥ (३) 4 श्रीषड्गुणैश्वर्यं जयासि शोभे । सर्वज्ञता शांति दमादि लार्भे ॥ जो सर्वभूर्ती दिसतो जनाते | वंदीन त्या श्रीगुरुराजयातें ॥ १ ॥ श्रीशंकराचार्य नृसिंह राणा । वादीं मदोन्मत्तमतंगजांना ॥ निर्दाकुनी दाखवि कौतुकातें | वंदीन त्या श्रीगुरुराजयातें ॥ २ ॥ कामादि जे षड्रिपु तापदाते । तैखाचि जन्मप्रलयापदा ते ॥ नाशीतसे जो स्मरतां पदांतें । वंदीन त्या श्रीगुरुराजयातें ॥ ३ ॥ दैदीप्य कांती परि शांत भासे । फेटा शिरी भजरिचा विलासे ॥ रुद्राक्षमाळा धारे कंघरीं ते। वंदीन त्या श्रीगुरुराजयातें ॥ ४ ॥ पाहोनियां रम्य विशाल नेत्र । वाटे दुजा हा मज भाळनेत्र ॥ पूर्णेदुवत् देखनियां मुखाते | वंदीन त्या श्रीगुरुराजयातें ॥ ५ ॥ विस्तीर्ण वक्षःस्थल दीर्घ बाहो । शोभे कसा देशिक हा पहाहो ॥ हाती घरी दंडकमंडलू ते । वंदांन त्या श्रीगुरुराजयातें ॥ ६ ॥ पाय खडावा कटिं मेखला हे। कैशी पहा दिव्य विराजताहे ॥ ऐशा महाराज दयानिधीतें । वंदीन त्या श्रीगुरुराजयातें ॥ ७ ॥ काषाय वस्त्रा परिधान केले । भाळी त्रिपुंड्राप्रति लावियेलें ॥ श्रीकंठपूजाप्रियशा जनांतें | वंदीन त्या श्रीगुरुराजयातें ॥ ८ ॥ तोडावया बंधन संसृतीयें। या इंद्रवज्रासम होय साचें ॥ श्रीमद्गुरूवंदन हें यथार्थ । भावार्थ बोले कवि रंगनाथ ॥ ९ ॥ ।