पान:काव्यपीयूष-पुस्तक २ रे.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जो देही असुनी विदेहि दिसतो ब्रह्मस्वरूपीच तो । विद्याशंकरभारती प्रवर हा साष्टांग मी वंदितों ॥ ६ ॥ ज्याचें दर्शन नाशित अघमती, देते सुबुद्धी जनां । दावी सत्पथ अज्ञमानवगणां हे ईश्वरी योजना ॥ जो लोकत्रयिं पूज्यपाद नृहरी ज्ञानार्कसा होय तो । विद्याशंकरभारती प्रवर हा साष्टांग मी वंदितों ॥ ७ ॥ दांची सदने पवित्र करिते यत्पादधूळी पहा । प्रेमें दर्शन देतसे गुणनिधी केवल्यदाता महा ॥ घालूं या जनहो, तयासि प्रणती डोळांभरी पाहुं तो । विद्याशंकरभारती प्रवर हा साष्टांग मी वंदितों ॥ ८ ॥ विद्याशंकरभारती, तवकृपें नाशोत शिष्यापदा । या दासाकरवी अशीच तुमची सेवा घडावी सदा ॥ द्यावी भेट पुन्हा जनां सकळिकां हें मागणे मागतों ॥ स्वामी, जोडुनियां करद्वय पदों साष्टांग मी वंदितों ॥ ९ ॥ (इंद्रवज्रा.) ( २ ) जन्मोनि केलें बहु पूत भूका । अद्वैतधर्म प्रतिपादियेला ॥ तैसेचि ते नास्तिक जिंकियेल । त्या श्रीमदाचार्यपदां नमी ॥ १ ॥ वेदोक्त धर्मा यजुनी जयांनी स्वं कारिला दुष्पथ अग्रजांनीं ॥ त्यांतें जये सरस्थ दाखवले । त्या श्रीमदाचार्यपदां नमीलें ॥ २ ॥ संन्यासदीक्षेखि यथाविधीनें । स्थापूनियां अज्ञ जनांसि जेणें ॥ देवोनि सद्धांध कृतार्थ केले त्या श्रीमदाचार्यपदां नम ॥ ३ ॥ नाशोनि अज्ञान सबुद्धि देतो। तैसेचि तापत्य शांतवीतो ॥ जेणे सुखी सर्व जनांसि केके त्या श्रीमदाचार्यपदां नमीलें ॥ ४ ॥ नानामतें खंडुनि वेदधर्म संस्थापिळा जाणुनि है स्वकर्म | जेणे असे लोकहितार्थ केलें । त्या श्रीमदाचार्यपदां नमीलें ॥ ५ ॥ जे मोहिले देखुनि आभिषांते । झाले पहा मन भवांबुध ते ॥ त्यांना जये सत्वर काडियेलें । त्या श्रीमदाचार्यपदां नमीळें ॥ ६ ॥ । T