पान:काव्यपीयूष-पुस्तक २ रे.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य वंदन. श्रीगुरुचें चरणांबुज जे तें मुख्य होय मंगल गा ॥ - मोरोपंत. - ( शार्दूलविक्रीडित. ) श्री विश्वेश्वर पादपद्म हृदयीं ध्यावें भजावें सदा । गावें निर्मळ मानसें कविजने त्याचे यशा कामदा ॥ जो सञ्चिद्धन पूर्णबोधमय जो श्रीशंकराचार्य तो। विद्याशंकरभारती प्रवर हा साष्टांग मी बंदितों ॥ १ ॥ आहे जो बहु शांत दांत रमला श्रीकंठनामी सदा । बेदांचा मथितार्थ सांगुनि जनां नाशीतसे दुर्मदा ॥ संन्यासाश्रम घेउनी महितळीं दीक्षार्थ जो हिंडतो । विद्याशंकरभारती प्रवर हा साष्टांग मी वंदितों ॥ २ ॥ ऐश्वर्यै न भुळे बसे सदयता वित्तीं असे जो कृती | भेदाभेद नसे समान गणितो जो सान थोरांप्रती ॥ धर्माचा जणुं मूर्तिमंत पुतळा श्रीमन्महाराज तो । विद्याशंकरभारती प्रवर हा साष्टांग मी बंदितों ॥ ३ ॥ नाना संशय वारुनी प्रतिदिनों ज्ञानामृता पाजितो । अंतेवासि जनांसि; कल्पतरु जो दीनांप्रती भासतो ॥ काँ हा मोक्षद साधकांसि दिसतो आहे महोदार तो । विद्याशंकरभारती प्रवर हा साष्टांग मी वंदितों ॥ ४ ॥ मायामूळ जळे अहंमति गळे कैवल्य तें आकळे । वांच्छा ही वितुळे खचित्त न चळे ज्याध्या दयेच्या मुळे ॥ तारी जो स्वबळे भवार्णवजळी स्वामी कृपासिंधु तो । विद्याशंकरभारती प्रवर हा साठांग मी वंदितों ॥ ५ ॥ निर्लोभी बहु धैर्यवंत न पवे जो हर्ष सन्मानितां । की कोणी अवमानिले तरि नसे ज्याच्या मनीं खिन्नता ॥