पान:काव्यपीयूष-पुस्तक २ रे.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाचकांस दोन शब्द. पुस्तकांत श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्यवंदन ही या कविता प्रथम घेतकी आहे. ती पूर्वी हिंदुपंच, ठाणें, व मुंबई इंदुप्रकाश या पत्रांत प्रसिद्ध झाली आहे. या कवितेचीं कांहीं हस्तपत्रकेंही छापून वाटली आहेत. दुसरी कविता श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्यजन्माख्यान. याची पूर्वी लहान लहान पुस्तकें काडून विकली आहेत. त्या पुस्तकाच्या तीन आवृत्ती मिळुन सुमारें ४००० प्रती खपून गेल्या, तरी प्रतींची मागणी आहेच! त्या कवितेचा या पुस्तकांत समावेश करीत आहे. शंकराचार्य अष्टकाच लहान पलकें पूर्वी छापलीं तें पुस्तकांत शेवटी घातले आहे. विशेष. करून वैदिक धर्माभिमानी लोकांतच या कवितांचा खप होत आहे. जगद्गुरूंचे ठिकाणीं ज्यांची निष्ठा असेल त्यांनी माझे या पुस्तकास उदार आंश्रय द्यावा. रसिक वाचकवृंद माझे लहान लहान पुस्तकांला आजपर्यंत अंतःकरणपूर्वक योग्य मदत करीत आहेत, तसेच उत्तरोत्तर अधिक साहाय्य करण्यास देवाने त्यांस सुबुद्धि याबी. रंगनाथ हरि अधिकारी.