पान:काव्यपीयूष-पुस्तक २ रे.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमच्छंकराचार्याष्टक. अनुष्टुप्छंद. श्रीमज्जगद्गुरु स्वामी विद्या नृसिंह भारती। भ्रमती तत्पदांभोजों भूसुरभ्रमरतती ॥ १ ॥ संचारार्थ फिरतांना भेटले मजला यती । हंस स्वरूप प्रत्यक्ष जाहली क्षण संगती ॥ २॥ सेविला शंकराचार्ये कृष्णातट सदाश्रम | विलोकितांचि मी त्यांना इरले सगळे श्रम ॥ ३ ॥ चरणीं पादुका दिव्य भव्यमूर्ति विराजते । शरीरी भगवीं वस्त्रे झळके ब्रह्मतेज तें ॥ ४ ॥, कृपा पोटी परिपूर्ण बोल ज्यांचे मनोहर । स्वधर्मरक्षणासाठी अवतार घरी हर ॥ ५ ॥ भेटिचा ज्याचिया काही घ्यावया इच्छिती सुर । ते हे श्रीशंकराचार्य बालार्कीपरि भासुर ॥ ६ ॥ शरणागत रक्षण | भस्म रुद्राक्ष धारण ॥ ७ ॥ शांतदांत शुचिष्मंत निजानंदी निमन जे । स्वामी जगद्गुरु त्यांना रंगनाथ कवी भजे ॥ ८ ॥ नारायण मुखीं नाम करीती नित्य सर्वांगी