पान:काव्यदोष विवेचन.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. हरकत नाही. मग त्या तशा बनलेल्या विचारांप्रमाणे आचरण होते आणि त्या विचारांच्या व आचरणाच्या उलट दुसन्यांचे विचार व आचरण असले तर ते अयोग्य व चुकीचे आहे व आपले स्वतांचे नीट व सत्यतेचे आहे असें सिद्ध करण्याकरितां, त्या संबंधाने पाठ असलेल्या कविता किंवा कवितेचा एखादा दुसरा चरण लागलाच ह्मणून दाखवायाचा. हा प्रकार आपल्या फारच दृष्टोत्पत्तीस येतो. ही गोष्ट लक्षां. त आणून पाहतां शाळांत चालू असलेल्या पुस्तकांत ज्या कविता असतात त्या कशा खऱ्या विचारांच्या, उपयुक्त, आचरणीय व व्यवहारोपयोगी अशा असल्या पाहिजेत हे सांगणे नलगे. ह्या पुस्तकांत ज्या कवितांवर टीका केली आहे त्या पैकी शेवटले पांच श्लोक नवनीताच्या नवीन आवृत्तीतून गाळले आहेत असे, हे पुस्तक छापत असतां माझे मित्र वे० शा० सं० रा. रा. बाळयज्ञेश्वर गुर्जर शास्त्री यांनी मला सांगिलें हे ऐकून आनंद वाटतो. शेवटी, सकल सज्जनांला नम्रतापूर्वक माझी एवढीच प्रार्थना आहे की, त्यांनी आपल्या अमोल्य वेळापैकी कांहीमा वेळ खचून हा माझा “काव्यदोषविवेचन" नामकली ग्रंथ आपल्या सकुमार हस्ती घेऊन वाचावा व आपल्या पवित्र अंतःकरणाने विचार करावा आणि काव्यदोष निरसन होण्यास कारणीभुत व्हावे, ह्मणजे माझ्या अत्यल्पशा श्रमाचें बहुत सार्थक्य झाले असें मी समजेन. मुंबई, ता० १० वी, माहे मे, रसिमियन बेंजामिन. इ० स० १८८३, पायधुणी, घर नंबर २६. ग्रंथकार.