पान:काव्यदोष विवेचन.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साहित्य काव्यदोषविवेचन. किंवा सरकारी मराठी शाळांतील क्रमिक सहा पुस्तकें व नलोपाख्यान यांतील काही कवितांवर टीका. गृहस्थ हो, आजच्या आपल्या व्याख्यानाच्या संबंधाने फारसा उपोद्दात करण्याची जरूर नाही. कारण सर्व स्पष्टीकरणाचा समावेश व्याख्यानांतच होणार आहे. आपल्या येथील सरकारी मराठी शाळांत जी क्रमिक सहा पुस्तकें चालू आहेत ती यथाक्रमें मराठी सहा इयत्तांसाठी व त्यां पैकीच पांचवें पुस्तक १ ल्या व सहावें पुस्तक २ ऱ्या आंग्लोव्हा . क्युलर इयत्तेसाठी नेमिले आहे. तेव्हां ह्या पुस्तकांतील कविता यथानुक्रमें त्या त्या इयत्तेला शिकवितात. शिवाय मुलकी परिक्षेस जाणान्या उमेदवारांस सहाव्या पुस्तकांतल्या कविता लागतात. तसेच पुण्यांतील फीमेल ट्रेनिंग कालेजांतून ज्या स्त्रीशिक्षक तयार होऊन येतात त्यांस पहिल्या पुस्तकापासून तर पांचव्या, सहाव्या पुस्तकांतील कवितांच्या अन्वयार्थाने स्पष्टीकरण करण्यांत वाकबगार व्हावे लागते. आतां नलोपाख्यान जे आहे त्यांतून एकंदर ।