पान:काव्यदोष विवेचन.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[५९] - ण्याला अवकाश मिळतो तसतशी तिची छाती भरीव दिसू लागते; आणि जसजशी तिची छाती भरीव दिसू लागते तसतसें, हे राजा, तिचे रूप सर्व रतनमयच आहे की काय असे वाटते. आणखी पुढे: “ विस्तीर्ण वर्तुळ उदग्र कठोर भारी॥ वर्धिष्णु त स्तन तिच कनकानकारी ।। ज्याचे उर्ग उमटतील ठसे तयांचे ।। बोलों कितो मुरुतसंध सख्या तयाचे ।।७१।।" हणजे, जी स्तने मोठी असून वाटाळी व ज्यांच्या बॉड्या पुढे आलेल्या आहेत व ज्या फार घट्ट आणि ज्यांची वाढ संपली नाही, हणजे अद्यापि जी वाढतच आहेत, व जी सोन्या सारखी पिवळी आहेत त्या स्तनांचे ज्या पुरुषाच्या छातीवर ठसे उमटतील हणजे दाबले जातील हणजे जो परष तिला भोगील तो किती पुण्यवान असेल ह्मणान सांगं ? खरोखरच गृहस्थ हो, हे जे मी आपणांला सांगत आहे त्याजबद्दल माझ्या मनाला फार लाज वाटत आहे, पण ज्याअर्थी मी हा विषयच हातांत घेतला आहे त्याअर्थी आपले काम यथास्थितपणे बजावण्याविषयी प्रयत्न क. रणे माझे कर्तव्य आहे. त्याला लाजून काय फळ? तथापि लाज वाटते खरी हे आपणांस सांगितल्याशिवाय माझ्याने राहवत नाही. आणि कोणाला लाज वाटणार नाहीं बरें? पण करावें काय? शरीर विकृतीसाठी जसें औषध घेतले पाहिजे तद्वत् ह्या गोष्टी आहेत. मो त्या बोलल्या पाहिजेत