पान:काव्यदोष विवेचन.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

26साह ती डोंगरी उपजली पिवळी विशाळें ।। निवें तशी नवघनस्तनचक्रवाळें ।। त्या पंकजांत मिनला अलि सक्त तो की ।। जो नीलिमा सुनयनी सुजना विलोकीं ।। ६९।। " तिची ती वाटोळी व नूतन ( नवी कोवळी ) दाट ( टणक ) स्तने ही डोंगरांतील लिंबाच्या झाडांवर आलेली जशी मोठी व पिवळी लिंबे असतात तशी आहेत. आणखी काय तर, ती स्तने हीच कमळे व त्यांवर जो काळेपणा आहे तोच त्यावर तल्लीन झालेल्या भ्रमरा सारखा दिसतो, तो है सुजनराजा, तूं आपल्या चांगल्या नेत्रांनी पहा. हाय, हाय, काय बिचाऱ्या साध्वी दमयंतीच्या शरीराचा विचका हा! आणि सरकारी विद्याखात्यांच्या इयत्तां सारी कसल्या कवितांची निवड ही!!! अरेरे, हे मायबाप सरकारा, आमच्या प्रियकर मुलांची मनें ह्या अशा घाणेरड्या वर्णनांनों नको हो विटाळवू. येथपर्यंत जें दमयंतीच्या स्तनांचे वर्णन केले तेवढ्यांमीच तृप्त न होतां अद्याप पुढे त्यांचेच वर्णन चालले आहे, ते हे भात जन हो, आपले ओशाळलेलें अंतःकरण लावून ऐका. "जों जो घनस्तन भरूं अवकाश देतो।। तो तो तिचा उरभरीव दिसोनि येतो ।। जो जो दिसे उर भरीव तयाशि तो तो ।। राया उरोजमय रूप असें पहातों ।।७०।।" याचा अर्थ असाकी, जसजशी तिची घट्ट स्तने भर