पान:काव्यदोष विवेचन.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[५७] प्रलोक. (वसंततिलका.) " राया तिचे मुख सुधाकर या द्वयाला ।। नाहींच वेगळिक हे गमतें मनाला ।। संपूर्ण नित्य असता नसता कलंको ।। हा चंद हे मुख असें मग कोण शंकी ।।६७||" हणजे राजहंस ह्मणतो, हे राजा, मला असे वाटते की, तिचे मुख व चंद्र यांत भेदच नाही. एवढे मात्र की, चंद्र जर नेहमी पूर्ण असता व त्याला डाग नसता, तर हे मुख आहे किंवा हा चंद्र आहे अशी शंका कोणासही आली नसती. अर्थात् चंद्र तिच्या पेक्षां सौंदर्यात कमी होय. असो; ह्याजबद्दल आपणांला कांहीं हणणे नाही. पुढें, राजहंस दमयंतीचे नाक व ओंठ यांचे वर्णन करितो: " चांपेकळी परिसही सरळ.त्व नाकीं। जीचा धरी अधर विदुमभावना की ।। भासे मनांत मज विबफल भ्रमानें ।। की सत्य चंचुपुट ओढविलें शुकानें " ।।८।। अर्थ:- तिचे नाक चांफ्याचे कळ पेक्षाही सरळ आहे, व तिचा खालचा ओठ पोवळ्याप्रमाण लाल आहे. जणू खालचा ओंठ हे तोंडलेच आहे असे समजून, तिचे ना. क हीच पोपटाची चोंच असून ती त्याने ते ताडले घेण्याकरितां पुढे केली आहे की काय असे मला वाटतें.--पुढे बिचाया दमयंतीच्या स्तनां विषयी वर्णन आहे.