पान:काव्यदोष विवेचन.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

26साहे यंती नळराजाविषयों गुप्त रूपाने मोहित झालो, व तिच्या मनाला मदनाने टोचणी लाविली, झणजे तिला काम उत्प. न्न होऊन त्रास होऊ लागला. हा दोन ओळींचा अर्थ झाला. पुढे कवि ह्मणतो की, बरें आतां हैं असो. मग तिच्या बापाने ह्या ब्राह्मणांस पुष्कळ द्रव्य व वस्त्रे देऊन मार्गस्थ केले. हा प्रकार कसा प्रशस्त आहे आणि विशेष करून शाळांतील विद्याथ्यांस किती आवश्यकतेचा आहे हे, "मदनाने टोचणी लाविली " वगैर प्रकारांवरून उघड होते. पुढे, भीमराजाकडे जे ब्राह्मण आले होते त्यांनी दमयंतीचे सौंदर्य पाहून ते मोठे चकित झाले, आणि दमयंती विषयी सर्व हकिकत नळराजास जाऊन सांगितली. ती एकताच त्याला दमयंतीविषयी अतिशय इच्छा उत्पन्न होऊन तिच्या विरहाने तो झरत चालला. रात्रंदिवस त्याला चन पडेना अशी त्याची अवस्था झाली. एके दिवशी तो नगराबाहेर फिरावयास गेला तेथे एका बागेत तळे होते त्या तळ्यांत राजहंस पोहत असून एक हंस किनाऱ्यावर निजला होता, त्याला राजाने धरिले, परंत त्या हंसाने नळाची फारच स्तुति व काकळत केल्यावरून नळाने त्यास सोडून दिले. हा नळराजाचा उपकार स्मरून तो हंस पुन्हा काही वेळाने नळाकडे आला आणि ह्मणाला की, तं ज्या स्त्रियेच्या विरहाने झुरत आहेस ती दमयंती मी तुला बायको करून देतो." अस ह्मणून तो हंस तिच्या सौंदर्याचे वर्णन करून नळ राजास सागतो. प्रथम तो तिचे मुख कसें तें सांगत आहे: