पान:काव्यदोष विवेचन.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सोमाभिरामवदना सदनांत रंगी ।। क्रीडा करो तुजसवें ललना पलंगी ॥ १२ ॥" ह्याचा अर्थ असा की, तुझ्या दाराशी हत्तीचे समुदाय झुलोत व छोडे हिसोत. हणजे हत्ती व घोडे हे नेहमी तुझ्याजवळ पुष्कळ असोत. आणखी, हे शूरा, तुला सर्व लोक खुषी असोत, आणि चंद्रासारखें रमविणारे आहे मुख नीचे, अशी स्त्री तुझ्या घरांत तुजबरोबर पलंगावर क्रीडा करो. खरेच सांगा, हा आशीर्वाद करण्याचा कोणता प्रकार बरें ? ह्यावरून याचक व राजा या उभयतांची योग्यता चांगली दिसून येते, आणि त्यांत उपवर दमयंती मुलगी बापाजवळच बसली असतांही हा एवढा निर्लज्ज प्रकार ! मोठे सखेदाश्चर्य !! हा ब्राह्मणाचा राजास आशीर्वाद झाल्यावर, राजाने त्यांस तम्ही कोठून आलां वगरे विचारून मग नळराजाविषयी विचारपूस केली, त्यावरून त्यांनी नळराजा विवेकी, जनांचे पालन कर्ता, सुबुद्ध, धैर्यवान, सूर्यासारखा तेजस्वी, गंभीर, नवरसांमध्ये जसा शृंगार रस मुख्य तसा तो ज्ञाते लोकांत पहिला वगैरे प्रकारे नळ राजाचे गुण भीमराजाजवळ वर्णिले त्यावरून: दिडी.PIRE " भीमकी ते मोहिली गुप्तरूपें ।। मनी लावियला वेध कुसुमचा ।। असो गौरविले विप्र तिच्या बा।। धनें वरुने त्यां दीधली अमू।।२१।।" हणजे हे सर्व त्या ब्राह्मणांचे भाषण ऐकून ती दम