पान:काव्यदोष विवेचन.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

णार्थ आहीं रयतेने व सरकाराने झटले पाहिजे. सरकार तर तसे झटते व झटण्यास तयार आहे. पण कोठे कांहीं दोष असेल तर आपण तो दाखविणे हे आपले कर्त्तव्यकर्म आहे. असो, येथपर्यंत मराठी सहा व आंग्लोव्हरन्याक्युलर दोन इयत्तेतील आपला विषय संपला. आतां आंग्लोव्हरन्याक्युलरच्या तिसऱ्या इयत्तेतील नलोपाख्यानांतील कविता मात्र उरल्या त्यांतील अगदी थोड्याशा कवितांबद्दल विचार करून हे आपलें व्याख्यान पुरे करूं. नलदमयंतिस्वयंवराख्यान. प्राचीन काळी निषध देशांत वीरसेनाचा मुलगा नळ नामें राजा होऊन गेला त्याचें, विदर्भ देशाचा भीमनामें राजा राज्य करीत होता, त्याला दमयंती नांवाची मोठी लावण्य संपन्न मुलगी होती तिच्याबरोबर स्वयंवर झाले त्याबद्दलची कथा ह्या काव्यांत आहे. विदर्भ देशच्या भीमक राजाची कन्या जी दमयंती ती तारुण्यामध्ये आल्यावर एके दिवशी आपल्या बापाजवळ बसली असतां, नळ राजाच्या निषधदेशांतून, याचना करण्यास्तव काही ब्राह्मण भीमराजाकडे आले, त्या ब्राह्मणांनी ह्या भीमराजास आशीर्वाद केला तो असाः श्लोक. "द्वारीं झुलोत गजसंघ हिसोत वाजी ॥ गाजी तुला सकल लोक असोत राजी