पान:काव्यदोष विवेचन.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कार्तिक मासी शाप संपतो माझा तुज हे ठावें ।। चार मास हे मिटूनि डोळे कैसे तरि कंठाये ॥९॥ नंतर सखये यथेच्छ पुरवू मनिचे सर्वहि कोड ।। करुनि विलासा, पूर्व वियोगें होतिल जे अति गोड ।।९।। आतां हे श्रोते जन हो, कामवासनेच्या लाळ घोंटणीचो व तिजवरून कामेच्छेची गोडी उत्पन्न करणाऱ्या प्रकारां विषयींची कमालच झालो. कामज्वराचें भाजणे, मनामध्ये दृढालिंगन देणे, स्वमामध्ये स्त्रिला पाहून तिला आपल्या उराशी घट्ट प्रेमाने कवटळण्यास हात पुढे करणे, नवराबायकोचो परस्पर भेटण्याविषयींची उत्कंठा, पतोची भेट पुढे होईल त्या वेळी सर्व मनोरथ पूर्ण होतील अशाबद्दल लाळ घोंटोत, व नाना प्रकारे विषयसुखाच्या कल्पना मनांत आणून काळ क्रमणे व चातका प्रमाणे त्या वेळेची वाट पाहणे, नंतर मग भेटी अंती नवरा बायको ही, नानाप्रकारचे विलास करून परस्परांच्या मनांतले सर्व कोड यथेच्छ पुरविण्याविषयी आश्वासन देणे व पुरविणे वगैरे गोष्टी समजण्यासाठी आमच्या ह्या देशांतील मुलां मुलींचे किती अडलें आहे व ते सर्व प्रकार कळणे हे केवढे अत्यावश्यकतेचें आहे ते, हे मम प्रिय बंधु हो, आपण विचार करा, आणि आपल्या लेकरांस कामज्वराविषयींच्या कल्पनेच्या जळत्या भटींतून मुक्त करा की, जेणेकरून त्यांची मने विस्खलीत न होतां स्थिर, शांत व शुद्ध हात्साती तमच्या बालविवाह निषधाच्या स्तत्य प्रयत्नास भूषणार्ह होतील असे करा. पुढच्या होणा-या प्रजेच्या कल्या