पान:काव्यदोष विवेचन.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[५१] " असेल अथवा पिंज-यापाशी उभी पुसत मॅनेला ।।। कांगे आटवतो तुजला तो प्राणसखा रंगेला ।। ७२ ॥" एवढी ती माझ्या वियोगाने वेडी झाली असेल की कोणी मनुष्य माझ्याविषयी बोलायाला नाही ह्मणून मैनेशी तरी बोलत असेल की मैने “ तुजला तो प्राणसखा रंगेला" आठवतो कायग? पुढे तो दुःख दर्शवून सांगतो की; " गृहरूत्याच्या योगें लोटिल कशी तरी दिवसास ।। परि रात्री मम विरह तियेला देइल बहु आयास ।। ७४ ॥" दिवस जो आहे तो कामकाजांत कशी तरी ती घालवील, पण रात्री कामोत्पत्ति होऊन तिला त्यामळे मोठा त्रास होईल ह्मणन तो ह्मणतो की, तिला असे त्रास होऊं नयेत झणून माझा निरोप कळविण्याकरितां मध्य रात्रों जावें, आणि तूं ज्यावेळी जाशील त्यावेळी: " देखशील तं तिला तेधवां भुईवरी निजलीला ।। करीत तळमळ गाळित अश्रु आटवुनी मम लीला ॥७५ ॥" सन्निध असतां मी पूर्वी जी क्षणा प्रमाणे गेली ।। आनंदाच्या भरांत करूनी परोपरीच्या केली ।।७७।। युगाहुनीही मोटी आतां तीच रात्र होईल ।। कशी बापुडी दुःख असे हे न कळे मज साहील" ।।७८॥ ह्मणजे तूं मध्यरात्री गेल्यावर ती तुझ्या कशी दृष्टीस पडेल तर, ती जमिनीवर निजली आहे व तळमळ करीत आहे आणि माझी लीला आठवन अश्रु गाळीत आहे. पाहा, मी तिच्याजवळ असतां आला नाना त-हेच्या क्रीडा करून