पान:काव्यदोष विवेचन.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[५०] फुलांचे झुबके शोभतात तसेच हिचे स्तन हिला शोभतात. पुढ, तिचे चालणे मदमस्त हत्ती प्रमाणे असून तिच्या शरीराच्या बांधणींत कोठेच कांही कमतरता नाही. सारांश ती रूपाने एवढी पूर्ण आहे की, ब्रह्मदेवाच्या हातून दुसरी इच्या एवढी रूपवती स्त्री उत्पन्न झालीच नाही! एवढ्या सर्व खुणाखाणा सांगून तो यक्ष मेघदूतास ह्मणतो की;- " खुणांवरुनि या घना ओळखी बा अपुल्या वहिनीला ।। मुख्य सहावा प्राणचि आहे जी या मम शरिराला ।। ६८ ।। " वः एखादी स्त्री ओळखण्याच्या ह्या खुणा काय ? आणि त्यांत स्वतः नवरा आपल्या स्त्रीच्या खुणा स्तनांच्या आकारासहित सांगतो. काय सांगावें! कामवासनेची हद्दच झालो. बरोबर झटले आहे की “कामातुराणां न भयं न लज्जा." तेव्हां पाहा ह्या प्रकारचे, कामवासनेनें निर्लज्ज झालेल्या व वेडावून गेलेल्या यक्षाच्या स्त्रियेच्या देहाचे वर्णन आणि तेही निर्लज्जपणाने, अति मोहक रीतीने व मधर साकी छंदांत वर्णिलेले आमच्या मुलांमुलींस कशा करितां शिकवावें बरें ? पुढे, तिला तूं कशी काय करितांना पाहशील असे सांगतांना, तो ह्मणतो की, माझी बायको माझ्या बद्दल चिंता करीत तळहातावर गाल टेकून बसली असतां, जसा अमर कमळावर बसलेला शोभतो त्याप्रमाणेच तिचे कुरळ केश तिच्या तोंडावर शोभत असतील; कदाचित् तिला देवाची पूजा करीत असतां किंवा माझा चेहरा मनांत आणून नो कागदावर काढतांना तूं तिला पाहशील. कदाचित: