पान:काव्यदोष विवेचन.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[४०] योजन नाही. आतां काव्यास आरंभ करूं. मेघानें कोणत्या मार्गाने जावे ह्याबद्दल यक्ष. सांगत आहे की: " अलका नामक त्या यक्षपुरी वरूनि मार्ग तव जाई ।। बसे प्रिया मम तेथे तिजला निरोप माझा नेई ।। १० ।। - जातां जातां वाटेत काय घडेल ते पुढे सांगतो आहे:"पांडुर वदना वरूनि सारूनी मागें. केस कराने।। पथिक कामिनी गगनीं तुजला देख तिल प्रेमानें ।। १९ ।। आतां वर्षाकाळ पातला, पति यतील गृहातें ।। ऐशा आश्वासतील पूर्वाऽनुभवें त्या स्वननातें ॥ २० ।।" ह्मणजे यक्ष ह्मणतो आहे की, हे मेघा तूं जातां जातां तुला असे आढळेल की, तूं जात असतां प्रवासी जनांच्या स्त्रिया आपल्या गोया तोंडावरून आपल्या हाताने. आपले केस मागें सारून वर आकाशांत तला प्रेमाने पहातील. कारण त्यांना असे वाटेल की, आतां पावसाळा आला तेव्हां आतां आमचे पति घरी येतील आणि त्यांच्या पूर्वीच्या अनुभवावरून पति आतां येतीलच अशाबद्दल त्यांच्या स्वतःच्या मनाची खात्री होईल. पटें यक्ष ह्मणतो की, होय बरोबरच आहे, कारण; " कोण सोडूनी समयीं ऐशा दयिता दूर घसेल ।। मत्सम परवश दुजा अभागी जर भवनांत नसेल ।। २१ ।। अर्थः--जर माझ्यासारखा कोणी दुर्दैवी जगांत नसेल तर अशा समयीं हणजे पावसाळ्यांत आपल्या बायकांला सोडून कोणी पति राहील काय ? केवढी कामिष्ट कल्पना