पान:काव्यदोष विवेचन.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१६] णिल्याप्रमाणे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आपल्या देशाच्या कल्याणच्छु जनाचे सदुद्देश सिद्धीस जावेत व त्यांच्या ह्या सदुद्देशाचा विपरीत परिणाम होऊं नये ह्मणून हे सद्गृहस्थहो, डा अयोग्य प्रकारच्या कविता आमच्या सरकारी शाळांतील पुस्तकांतून नष्ट करून टाकण्यास काया वाचा मनें करून प्रयत्न करावे, हे प्रत्येक आपल्या देशाचे, आपल्या मुलांबाळांचें व आपले स्वतःचे कल्याण इच्छिणाराचे कर्तव्यकर्म आहे. अहो आपण सुज्ञ, विचारशील व दूरदृष्टी आहांत. आपणांला सर्व कळतच आहे. मो आपणांस विशेष सांगावे असे काही नाही. आतां हे असे सर्व वर्णन करण्यांत व ह्मणण्यांत मी कोणा. च्या धर्मसंबंधी बाबतींत विरुद्ध बोलतों किंवा या कविता हिंदु धर्माच्या संबंधाने आहेत ह्मणून मी त्यांच्या विरुद्ध बोलतों असे नव्हे. त्यांच्या विश्वासाने किंवा भावाने जें खरें व बरें असें मानून घेतले आहे त्याबद्दल त्यांला वाईट वाटावे अशी माझी बिलकल इच्छा नाही. अहो, ह्या कविता तर शाईने लिहिल्या आहेत; पण हव्या असल्यास त्यांनी सुवर्णाच्या अक्षरांनी त्या लिहून आपल्या जिवापलीकडे बाळगून ठेवाव्या किंवा त्यांच्या तावजा करून आपल्या दंडास व गळ्यास बांधाव्या, त्याजबद्दल आमचे कांहीं ह्मणणे नाही. आमचे मणणे एवढेच आहे की, सरकारी शाळांतून चालणाऱ्या पुस्तकांत हे असले प्रकार नसावेत.