पान:काव्यदोष विवेचन.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[४४] सर्व जन बालविवाह मोग नाशकारक व सर्व प्रकार अयोग्य आहे अशाबद्दल उद्गार काढिताहेत, प्रतिपादिताहेत आणि अशाने विद्वान प्रजेचेच नव्हत तर अनेक अविझन प्रजेचेही, केवळ परुषांचेच नव्हत तर अनेक स्त्रियांचेही विचार बालविवाह विरुद्ध पडत आहेत, असे असतां आपल्या म. लांमुलींच्या शिक्षणार्थ जी सरकाराकडून पुस्तकें नेमलों आहेत त्यांत, नवराबायकोचं पलंगावरील आलिंगन हणजे त्यांचे एकमेकांस मिठी मारणे, बायकोचे नवऱ्याच्या उरावर पडून झोप घेणे, नवराबायकोनी एकमेकाला पोटाशों धरून निजणे, व हळहळ कजबुजत गोष्टी बोलणे, एकमे. कांच्या गालाला गाल, भुजांला भजा यांचा लगट करून नवराबायकोचें निजणे, तसेंच नवरा बायकोच्या एकांतांत बोलायाच्या गोष्टी एकमेकांशी बोलणे, व त्या नवरा बायकोचें एकमेकांच्या अंगावर तोलणे, हे प्रकार हे कामोद्दीपकहे बुद्धिधामक-हे विषयाची गोडी लावणारे प्रकार असणे हे फार भयंकर काम आहे. तर हे भयंकर व घातक प्रकार ह्या आमच्या सरकारी पुस्तकांत असावेत व एवढी वर्षे ते निमटपणे चालावेत ही मोठी सखेदाश्चर्याची गोष्ट आहे यांत किमपिहि संदेह नाही. हा प्रकार जर आपले दयाळू व आमची सुधारणा करणारे व सर्वोपरी आमचे हितेच्छ सरकारास कळेल तर ह्या गोष्टींचा बंदोबस्त होईल हे खचित आहे. अहो, अनंगरंग ह्मणून एक पुस्तक आहे ते लज्जाप्रद आहे असें ह्मणून ते विकणान्यांस सरकार